scorecardresearch

नवी मुंबई : वाशी बाजारात नाताळाची लगभग; भारतीय बनावटी साहित्य मोठ्या प्रमाणावर उपलब्ध

बाजारात चायना दीक्षा स्वदेशी बनावटीच्या वस्तूंना अधिक प्राधान्य देण्यात आलेले आहे. बाजारात सांताक्लॉज,ख्रिसमस ट्री, बेल्स, चांदणी, खेळणी, सांताक्लॉज असलेले हेअर ब्यांड, येशू व मेरी यांचे पुतळे , रोषणाई व विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य उपलब्ध आहेत.

नवी मुंबई : वाशी बाजारात नाताळाची लगभग; भारतीय बनावटी साहित्य मोठ्या प्रमाणावर उपलब्ध
वाशी बाजारात नाताळाची लगभग

ख्रिस्ती धर्मीयांचा महत्त्वाचा असलेला सण नाताळ काही दिवसांवर येऊन ठेपलेला असून सर्वच नागरिकांकडून विशेषतः शाळा, महाविद्यालयात, आणि खासगी कार्यालयात नाताळ सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यामुळे दिवसेंदिवस नाताळच्या सजावट साहित्याची मागणी वाढतच आहे. त्यानिमित्ताने वाशीतील बाजारपेठा सजल्या आहेत. सजावटीचे साहित्य खरेदीला ग्राहकांची लगभग पहायला मिळत आहे. बाजारपेठेत ९०% भारतीय बनावटीचे साहित्य उपलब्ध आहे.

हेही वाचा- नवी मुंबई: सायन पनवेल महामार्गावरील दुरुस्तीमुळे वाहतूक कोंडीचा बोजा पामबीच मार्गावर

नाताळ हा सण येशूंचा जन्मदिवस साजरा करण्याचा उत्सव आहे. यामध्ये येशूला अधिक महत्त्व दिले जाते. बाजारात येशू व मेरी यांच्या जीवन पटाची कहाणी , माहिती होण्यासाठी पुतळेस्वरुपी येशू प्रकटले आहेत. येशूंच्या जन्म ते मृत्यूपर्यंतची कहाणी सांगण्यासाठी विविध प्रकारच्या पुतळ्यांचा आधार घेऊन त्याचा एक संच तयार करून त्या संचाच्या आधारे त्यांचे जीवन रेखाटले आहे. ३००रु ते ६ हजार रुपये पर्यंत हा संच उपलब्ध आहे. बाजारात चायना दीक्षा स्वदेशी बनावटीच्या वस्तूंना अधिक प्राधान्य देण्यात आलेले आहे. बाजारात सांताक्लॉज,ख्रिसमस ट्री, बेल्स, चांदणी, खेळणी, सांताक्लॉज असलेले हेअर ब्यांड, येशू व मेरी यांचे पुतळे , रोषणाई व विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य उपलब्ध आहेत. यंदा या वस्तूंचे बाजारभाव २०% ते २५ % वाढले आहेत. यामध्ये सांताक्लॉज ४०रु ते ७००रु ,ख्रिसमस ट्री ८००रु ते १२ हजार रुपयांना उपलब्ध आहेत. विविध आकाराच्या चांदणी १००-१३०रु ,बेल्स ९०रु ते १५०रु, स्नो मॅन १०० रु ते ३०० रुपयांवर उपलब्ध आहेत. हेअर ब्यांडवर विविध आकाराचे असलेले सांता याला ही अधिक मागणी आहे. ग्राहक हेअर ब्यांड खरेदीला अधिक पसंती देत आहेत.

हेही वाचा- नवी मुंबई: कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसरात पथदिवे नसल्याने बनला मद्यपींचा अड्डा; महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

ख्रिसमस ट्री ठरताहेत आकर्षक

नाताळ सण साजरा करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे ख्रिसमस ट्री.. मग ती लहान-किंवा मोठ्या आकाराची असते. नाताळमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ख्रिसमस ट्री नागरिकांच्या पसंतीस पडतात. यंदा बाजारपेठेत नेहमीच्या ख्रिसमस ट्री पेक्षा स्नो-ट्री आणि चेरीचे अधिक आकर्षक ठरत आहे. स्नो ट्रीवर बर्फ असल्याचे भासवून स्नो ट्री उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच ख्रिसमस ट्रीच्या भोवताली विद्युत रोषणाई आणि चेरी ठेवले असल्याने ट्रीवर आधीच सजावट केलेली आहे . स्नो ट्री ५ ते ६हजार तर चेरी ट्री ५५०० ते ७ हजार रुपयांना उपलब्ध आहे. त्यामुळे या दोघांना देखील अधिक पसंती दिली जात आहे अशी माहिती व्यापारी गोविंद सिंग राजपूत यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-12-2022 at 18:07 IST

संबंधित बातम्या