उरण येथील पिरवाडी समुद्र किनाऱ्यावर रविवारी पर्यटकांनी सुट्टीचा दिवस म्हणून गर्दी केली होती. यावेळी सुरक्षा म्हणून पोलीस बंदोबस्त ही ठेवण्यात आला होता.उरण मधील पिरवाडी समुद्र किनारा हा उरणसह, पनवेल,नवी मुंबई तसेच ठाणे व पेण मधील पर्यटकांसाठी एक दिवसाच्या पर्यटनाचे ठिकाण आहे.
हेही वाचा >>> उरण : जेएनपीए बंदरातून अडीच कोटींचे रक्तचंदन जप्त ; ३ हजार ३० किलो वजनाचे रक्तचंदन
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
त्यामुळे या किनाऱ्यावर या अनेक पर्यटक सुट्टी घालविण्यासाठी येतात. मात्र मागील आठवडा भर पाऊस असल्याने पर्यटकांची संख्या रोडावली होती. मात्र आज रविवारी ५ वाजल्यापासून पावसाने विश्रांती घेतल्याने उरण मधील स्थानिक व पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.