scorecardresearch

Premium

उरण : पाय घसरुन तलावात बुडालेल्या वृद्धेचा मृत्यू

उरण येथील मुळेखंड कोळीवाडा मधील आनंदी कोळी या ६५ वर्षीय वृद्धेचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे.

Dead
( संग्रहित छायचित्र )

उरण येथील मुळेखंड कोळीवाडा मधील आनंदी कोळी या ६५ वर्षीय वृद्धेचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे.उरण तालुक्यातील मुळेखंड- कोळीवाडा येथील आनंदी कोळी यांच्या हाताला काही दिवसांपूर्वी मार लागला होता.यावर कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रातऔषधोपचार सुरू होते.शुक्रवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास सदर महिला औषधे आणण्यासाठी कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्राकडेनिघाली होती.

हेही वाचा >>> उरण : जोरदार पावसाचा भात शेतीला फटका ; शेतकरी चिंताग्रस्त

निर्जनस्थळावरुन जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या तलावात पाय घसरून पडली आणि बुडून मृत्यू झाला.शुक्रवारी रात्रीच्या सुमारास तिचे शव तलावात तरंगताना दिसून आल्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी उरण पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनीही तिच्या नातेवाईकांचा शोध घेऊन शवविच्छेदनानंतर प्रेत त्यांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी उरण पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.अधिक तपास विजयकुमार कावळे करीत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Death of an old man who slipped and drowned in the lake amy

First published on: 17-09-2022 at 19:51 IST

आजचा ई-पेपर : नवी मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×