नवी मुंबई: Kharghar incident death toll महाराष्ट्र भूषण प्रदान समारंभात चेंगराचेंगरी आणि उष्माघाताने किमान ५० लोकांचा मृत्यू झाला असून मयत व्यक्तीची संख्या सरकार लपवत आहे. असा गंभीर आरोप नवी काँग्रेसने केला आहे. याची सखोल चौकशी आणि विशेष आदिवेशन भरवण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागण्या मान्य केल्या नाहीत तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा आजच्या पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे.

रविवारी जेष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराची श्री सदस्यांना पाणी सावली आणि वैद्यकीय सेवा वेळेवर न मिळाल्याने १४ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा उहापोह अजून सुरू असून या बाबत नवी मुंबई काँग्रेसने आज सानपाडा येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रदेश प्रवक्ते नासिर हुसेन, इंटक अध्यक्ष रवींद्र सावंत आणि तालुका अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड उपस्थित होते.

mahayuti maharashtra marathi news, mahayuti latest marathi news
महायुतीच्या जागावाटपात भाजपकडून शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसवर बाजी
What Uddhav Thackeray Said About Loksabha Election ?
उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास! “आम्ही महाराष्ट्रात ४८ जागा जिंकू भाजपाची ४५ + ची संख्या…”
Uddhav Thackeray
“शिवसेनेला नकली सेना म्हणणाऱ्यांना…”, उद्धव ठाकरेंचा भाजपावर थेट प्रहार; म्हणाले “इंजिनाची चाकं…”
The seat sharing dispute in the Grand Alliance ends in two days
महायुतीमधील जागावाटपाचा तिढा दोन दिवसांत सुटेल; ३ मित्रपक्ष युतीधर्म पाळत नसल्याबद्दल शिंदे गटात नाराजी

हेही वाचा >>> तुम्ही पित असलेला फळांचा रस सुरक्षीत आहे का?, एपीएमसीत कचऱ्यात टाकण्यात आलेल्या सफरचंदाचा कसा वापर होतोय ते बघाच…

सदर कार्यक्रमात ५० लोकांचा मृत्यू झाला, २०० पेक्षा जास्त जखमी, आत्ताही ८० लोक अजूनही उपचार घेत आहेत.  असा दावा प्रवक्ते हुसेन यांनी दावा केला. जे मृत झाले त्यातील अनेकजण उपाशी होते असा शवविच्छेदन अहवालात नमूद झाले आहे. असेही त्यांनी सांगितले. मयत लोकांच्या नातेवाईकांना १ कोटी नुकसान भरपाई आणि सरकारी नौकरी द्यावी, कार्यक्रमाची परवानगी देणार्यावर कारवाई करावी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राजीनामा द्यावा, माहिती लपवत असलंयाने विशेष आदिवेशन बोलावण्यात यावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.