पालिका प्रशासनाने स्मशानभूमींची पाहणी करण्याचे स्थायी समिती सभापतींचे आदेश
गावातील स्मशानभूमीची दहन शेड तुटले आहे. अग्रोली गावातील रहिवाशांना रेल्वे क्रासिंग पार करून स्मशनभुमीत यावे लागते. घणसोली नोड मध्ये स्मशानभूमी नसल्याने पार्थिव अंत्यसंस्कारसाठी दोन किलोमीटर दूर न्यावे लागते. इलठणपाडा येथील स्मशानभूमीत गैरसोयी आहेत, असे स्पष्ट करीत नवी मुंबईतील स्मशानभूमीच्या नरकयातनांबद्दल स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाला धारेवर धरले.
यावेळी स्थायी समिती सभापती शिवराम पाटील यांनी आठ वर्षांपूर्वी स्मशानभूमी व्हिजनअंतर्गत दुरुस्ती करण्यात आली होती; पण तिची दयनीय अवस्था झाली असून प्रशासनाने या स्मशानभूमीची पाहणी करून त्याची सुधारणा करावी असे आदेश दिले.
स्थायी समितीच्या बैठकीत सानपाडा सेक्टर ५ येथील स्मशनभुमीच्या सुधारणा व सुशोभिकरणाचा प्रस्ताव पटलावर आला असता नगरसेविका शुभांगी पाटील, नगरसेवक जगदिश गवते, नगरसेवक प्रशांत पाटील, नगसेवक भारती कोळी, नगरसेवक एम.के.मढवी यांनी आपआपल्या प्रभागातील स्मशनभूमीच्या दुरावस्थेच्या पाढा सभागृहात वाचाला. यांवर स्थायी समिती सभापती शिवराम पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत स्मशनभुमीची अवस्था दयनीय झाल्याचे सभागृहाच्या निर्दशनास आणून देत तत्कालीन पालिका आयुक्त विजय नाहटा यांनी शहरातील सर्वच स्मशनभुमीचे स्मशनभुमी व्हिजन अंतर्गत सुधारणा केली होती. पण आता या स्मशनभुमीचे दुरवस्था झाली आहे. त्याच धर्तीवर प्रशासनाने या स्मशनभुमीचे दुरुस्ती करावी अशी पाटील यांने प्रशासनाला सुचवले. यावेळी अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी ज्या स्मशनभुमीची दुरवस्था झालेली आहे, त्यांच्या डागडुज्जीचे काम तत्काळ हाती घेण्यात येईल असे सांगितले.