मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात घसरण होत आहे. हिरवा वाटाणा स्वस्त झाल्याने सर्वच भाज्या स्वस्त झाल्या आहेत, असे मत व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत आहे. सध्या बाजारात हिरव्या वाटाण्याचा हंगाम सुरू झाल्याने आवक वाढली आहे. त्यामुळे दरात घसरण होत आहे . त्याचबरोबर कोबीची आवक वाढल्याने आधी प्रति किलो ४ ते ६ रुपयांना उपलब्ध असलेल्या कोबी आता १ रुपयांवर आला आहे. तर कोबीची ६० किलोची गोणी १०० ते १५० रुपयांना बाजारात विक्री होत आहे.

हेही वाचा- नवी मुंबई पोलीस भरती; २०४ पदांसाठी तब्बल १२ हजार ३७५ अर्ज

Give time to employees to drink water every 20 minutes health department advises companies
दर २० मिनिटांनी पाणी पिण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेळ द्या, आरोग्य विभागाकडून कंपन्यांना सूचना
Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद

साधारणत: एपीएमसीत नोव्हेंबर महिन्यापर्यंत हिरवा वाटाण्याची अवाक खूप तुरळक प्रमाणात होते असते. या वाटाण्याच्या मंदीच्या हंगामात आवक कमी असल्याने त्याचे भाव गगनाला भिडत असतात. यावेळी हिरव्या वाटाण्याच्या दराने उच्चांक गाठला होता. घाऊक बाजारात २०० रुपये तर किरकोळ बाजारात २५० ते ३०० रुपये किलो दराने विक्री होत होता. मात्र डिसेंबर पासून वाटण्याची आवक वाढली असून वाटाण्याचा हंगाम सुरू झालेला आहे. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे . शुक्रवारी बाजारात हिरव्या वाटाण्याच्या एकूण ५७ गाड्या दाखल झाल्या होत्या.

हेही वाचा- बंदरावरील उद्योगात नोकर भरतीसाठी प्रकल्पग्रस्तांना अर्ज करण्याचे आवाहन; ६ जानेवारी २०२३ पर्यंत मुदत

यामधून ४८०० क्विंटल वाटाणा आवक झाली आहे. त्यामुळे आधी प्रति किलो २४ ते ३० रुपयांनी उपलब्ध असलेल्या वाटाणा आता १६ रुपयांवर विक्री होत आहे. घाऊक बाजारात वाटाणा स्वस्तात उपलब्ध होत असल्याने किरकोळ बाजारातही ३०-४० रुपये किलोने विक्री होत आहे. त्याचबरोबर बाजारात कोबीचे दरही गडगडले आहेत. बाजारात कोबीच्या २२ गाड्या दाखल झाल्या असून यामधून १९७१ क्विंटल कोबीची आवक झाली आहे. मागील आठवड्यात ४ ते ६ रुपये किलो दराने विक्री होणारा कोबी आज घाऊक बाजारात अवघे १ रुपये किलोने विक्री होत आहे. त्याचबरोबर कोबीची ६० किलोची एक गोणी १०० ते १५० रुपयांनी विक्री होत आहे. एकंदरीतच सर्व भाज्यांमध्ये कोबीचे दर मात्र चांगलेच गडगडले आहेत.

हेही वाचा- नवी मुंबई : नववर्षानिमित्त विक्रीसाठीची नवी वाहने रस्त्यावरच; नो पार्किंग जागेतच बेकायदा पार्किंग

आधी- आता

कोबी ४-६, १
हिरवा वाटाणा १६ ,२४
टोमॅटो ६-७, ८-९
हिरवी मिरची २४, ३०-३२