उरण: सिडकोने उरणला जोडणार द्रोणागिरी नोड ते पागोटे या पाच किलोमीटरच्या सागरी (कोस्टल) महामार्गावर जवळपास १ कोटी रुपये खर्च करून ४ हजार नारळाच्या झाडांची लागवड केली आहे. मात्र पावसाळ्यानंतर सिडकोच्या दुर्लक्षपणामुळे ही नारळाची वृक्ष पाण्याविना करपू लागली आहेत. त्यामुळे सागरी महामार्गाच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या नारळाच्या वृक्षांचे हाल होऊ लागले आहे.

उरण तालुक्यातील सिडकोने द्रोणागिरी नोड परिसरातील रस्त्यांवर विविध प्रकारची झाडे लावण्याचा संकल्प शासनाच्या माझी वसुंधरा ( झाडे लावा झाडे जगवा ) या माध्यमातून हाती घेतला आहे. त्या धर्तीवर सिडकोने पागोटे – भेंडखळ – करंजा बंदर या द्रोणागिरी नोड परिसरातील नव्याने निर्माण करण्यात आलेल्या कोस्टल रस्त्यांवर जवळपास एक कोटी रुपये खर्च करून नारळाची झाडे लावली आहेत.

rickshaw stolen from Badlapur last month recovered due to police vigilance
डोंबिवली वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे,बदलापूरमधील चोरीची रिक्षा सापडली
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Koper news
डोंबिवली: कोपर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ जिन्याच्या मार्गात बेकायदा गाळ्यांची उभारणी
Bike rider accident on Ghodbunder road thane
अपघात होऊन अर्धा तास झाला, पण कोणीही मदतीला आले नाही; घोडबंदर मार्गावर दुचाकीस्वाराचा अपघात
Sakkardara lake, Nagpur, unsafe,
नागपूरच्या प्रसिद्ध सक्करदरा तलाव परिसर सर्वसामान्यांसाठी असुरक्षित, काय आहेत कारणे?
Traffic jam on Ghodbunder road thane
‘ठाणेकर’ होऊन रहाण्याच्या हौसेवर कोंडीचे विरजण
flood in wardha river
ऐन पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू
Dombivli, local train passenger rescued
डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट-रूळाच्यामध्ये अडकलेली महिला प्रवाशांच्या सतर्कतेमुळे बचावली

हेही वाचा… उलवे नेरुळ उड्डाणपुलावर भीषण अपघात

पावसामुळे या झाडांना पाण्याची आवश्यकता नव्हती, मात्र सध्या प्रचंड ऊन पडू लागल आहे. या उन्हाच्या तडाख्यात ही झाडे पाण्याविना करपू लागली आहेत. तर दुसरीकडे रस्त्याच्या कडेला उगवलेल्या गवताला वारंवार आगी लागण्याच्या घटना घडत आहेत. याच ठिकाणावरून गॅस वाहिन्या जात असल्याने आग लागणे धोकादायक बनणार आहे. सिडकोने कोस्टल मार्गावर नारळाची झाडे वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी उरण मधील निसर्गमित्र महेश घरत यांनी केली आहे.