नवी मुंबई : ‘इंटेल’ या कंपनीच्या ९०च्या दशकातील ‘पेंटियम’ या संगणक प्रोसेसरच्या निर्मितीप्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणारे अवतार सैनी (वय ६८) यांचा बुधवारी सकाळी नवी मुंबईतील पामबिच मार्गावर अपघाती मृत्यू झाला. सायकलस्वारी करत असताना सैनी यांच्या सायकलीला मागून भरधाव वेगाने आलेल्या टॅक्सीने धडक दिली.

हेही वाचा >>> पाणथळ जमिनींवर निवासी संकुले! नवी मुंबईत पामबीचलगत फ्लेमिंगो अधिवास धोक्यात

Mukhtar Ansari Died
कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा तुरुंगात मृत्यू, घातपाताचा संशय; उत्तर प्रदेश पोलीस अलर्ट मोडवर!
Mumbai Women Buys 19 Flats Worth 118 Crores In Malbar Hill
“बंगल्यासमोर बिल्डिंग बांधली, समुद्र कसा बघू?”, म्हणत दक्षिण मुंबईत १९ फ्लॅट्स विकत घेणारी ‘ती’ आहे तरी कोण?
Cheistha Kochhar Accident
लंडनमध्ये PHD करणाऱ्या भारतीय विद्यार्थिनी चेइस्ता कोचर यांना ट्रकने चिरडलं, अपघातात मृत्यू
devendra fadnavis and manoj jarange patil (1)
मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट, “देवेंद्र फडणवीसांनी पहाटे तीन वाजता फोन केला आणि..”

अवतार सैनी हे चेंबूर ते खारघर, खोपोली अशी सायकलस्वारी नियमितपणे करत असत. ते आपल्या चमूसह बुधवारी सकाळी जात असताना पामबिच मार्गावर बेलापूरनजीक महापालिका मुख्यालयासमोर त्यांच्या सायकलला अपघात झाला. या दुर्घटनेत सैनी यांचा जागीच मृत्यू झाला. सैनी यांनी मुंबईच्या व्हीजेटीआय संस्थेतून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर अमेरिकेतील एका विद्यापीठातून मायक्रोप्रोसेसर आणि डेव्हलपिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि इंटेल कंपनीत रुजू झाले. १९९३ साली इंटेलने निर्माण केलेल्या पेंटियम प्रोसेसरच्या निर्मितीप्रक्रियेत ते प्रमुख रचनाकार होते. मायक्रोप्रोसेसरच्या रचनेशी संबंधित सात पेटंट सैनी यांच्या नावावर आहेत. २००४मध्ये ते इंटेलच्या दक्षिण आशिया विभागाच्या संचालकपदावरून निवृत्त झाले आणि भारतात स्थायिक झाले होते.