शिवसेना शिंदे गटात सामील होण्यासाठी खोटे गुन्हे, अदखलपात्र गुन्हे दाखल केले जात असून पोलिसांमार्फत धमकी देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक एम के मढवी यांनी केलाय.पत्नी विनया मुलगा करण हे सुद्धा माजी नगर सेवक आहेत.आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालयवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार राजन विचारेंच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद पार पडली. नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी शिंदे गटात जा अन्यथा तुम्हाला तडीपार करून तुमचा एनकाउंटर करू तसेच १० लाखांची मागणी केली असल्याचा खळबळजनक आरोप आयोजित पत्रकार परिषदेत माजी नगरसेवक एम के मढवी यांनी केला आहे.

हेही वाचा >>> मुख्यमंत्र्यांनी दि. बा .पाटील कुटूंबियांची पनवेलमध्ये भेट घेतली

पोलीस उपयुक्ताची बदली न झाल्यास आम्ही सह कुटुंब आत्महत्या करू असा इशारा देत माझ्या कुटुंबियांना काहीही झाल्यास याला सर्वस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्थानिक नेते विजय चौगुले, माजी आमदार संदीप नाईक आणि उपायुक्त विवेक पानसरे जबाबदार असतील असा इशाराही त्यांनी दिला आहे.दबाव टाकण्यासाठी खोट्या तक्रारी गुन्हे दाखल केले गेले, १८ जुलै पासून पोलीस संरक्षण काढून घेतले आता २० तारखेला तडीपार का करू नये म्हणून कारणे दाखवाची नोटीस पाठवण्यात आले आहे अशी मढवी यांनी माहिती दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.