संतोष जाधव

नवी मुंबई : करोनाकाळात नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य सुविधांत झालेली वाढ आता करोनाव्यतिरिक्त रुग्णांसाठीही उपलब्ध होत आहे. यातील सामाजिक दायित्व फंडातून घेण्यात आलेली सीटीस्कॅन सुविधा आता वाशी येथील पालिका रुग्णालयात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आताही या रुग्णालयात ही सुविधा आहे, मात्र ती एका खासगी संस्थेची असल्याने यासाठी रुग्णांना सवलतीच्या दरातील शुल्क आकारावे लागत होते. आता ही सुविधा मोफत असणार आहे.

There is no facility to detect the type of poison taken by the patient admitted to the government hospital
शासकीय रुग्णालयात दाखल रुग्णाने घेतलेल्या विषाचा प्रकार शोधणारी सुविधाच नाही!
condition of primary health centers in state is pathetic beds in rural hospitals are utilized only at 40 percent capacity
राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था दयनीय, ग्रामीण रुग्णालयांतील खाटांचा वापर केवळ ४० टक्के क्षमतेनेच
cashless health insurance
‘कॅशलेस’ आरोग्य विम्याला डॉक्टरांचा विरोधच! जाणून घ्या कारणे…
Kanjurmarg metro car shed, MMRDA, additional space
एमएमआरडीए कांजूरमार्गमधील जागेच्या प्रतीक्षेतच, कारशेडसाठी अतिरिक्त जागेची राज्य सरकारकडे मागणी

नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांच्या टोलेजंग इमारती करोनाकाळापूर्वी या फक्त  शोभेच्या वस्तू ठरल्या होत्या. परंतु करोनाकाळात याच इमारतींच्या सुविधांत आता वाढ होत असून त्याचा लाभ गरीब रुग्णांना मिळत आहे. आतापर्यंत पालिका आरोग्यसेवेचा संपूर्ण ताण वाशी रुग्णालयावरच होता. आता नेरुळ व ऐरोली येथील सार्वजनिक रुग्णालयांतही चांगल्या उपचार सुविधा मिळत आहेत.

नवी मुंबई महापालिका रुग्णालयांत यापूर्वी सीटीस्कॅन सुविधा नव्हती. यासाठी रुग्णांना ही सुविधा बाहेरून घ्यावी लागत होती. त्याचा रुग्णांना आर्थिक व इतर फटका बसत होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वी वाशी रुग्णालयात रुबी हेल्थ केअरच्या माध्यमातून ही सुविधा सुरू करण्यात आली होती. यामुळे रुग्णालयातच ही सुविधा मिळत होती.

परंतु आता पालिकेने करोनाकाळात सामाजिक दायित्व फंडातून १.९० कोटी फंडातून सीटीस्कॅन यंत्रणा खरेदी केली आहे. आता करोना रुग्णांची संख्या अत्यल्प असल्याने वाशी प्रदर्शनी केंद्रातील करोना रुग्णालयात असलेली ही यंत्रणा आता इतर रुग्णांसाठी वाशी रुग्णालयात हलवण्यात येणार आहे. त्यामुळे आजाराचे निदान करण्यासाठी आवश्यक असलेली स्वत:ची अशी सीटीस्कॅन सुविधा महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा वाशी रुग्णालयात सुरू होत आहे. त्यामुळे गरीब रुग्णांचा फायदा होणार असल्याची माहिती वाशी रुग्णालयाचे प्रमुख डॉ.प्रशांत जवादे यांनी दिली.

वाशी येथील पालिकेच्या रुग्णालयात आतापर्यंत एका संस्थेच्या माध्यमातून ही सुविधा रुग्णांसाठी सुरू करण्यात आली होती. परंतु आता पालिकेकडे स्वत:ची सीटीस्कॅन यंत्रणा असल्याने व त्यासाठी आवश्यक रेडिओलॉजिस्ट  व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आहे. पुढील काही दिवसांतच ही सुविधा प्रत्यक्षात सुरू करण्यात येणार आहे. – अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका