लोकसत्ता टीम

नवी मुंबई: सध्या माथाडी कामगार चळवळीची दिशा वाईट अवस्थेत आहे याचे मलाही खंत वाटते, मी ही कुठेतरी कमी पडतोय असे मला वाटते, आजपर्यंतच्या सरकारकडून माथाडी कामगारांना न्याय देण्यात अपयशी ठरले आहे असे मत माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले आहे. तसेच यावेळच्या स्व. आमदार अण्णासाहेबांच्या ४१ व्या पुण्यतिथीच्या सभेला एकाही लोक प्रतिनिधीना आमंत्रित केले नाही. माथाडी भवन येथे अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने ते बोलते होते.

NCP politician Chhagan Bhujbal pulled out of Nashik LS race
भुजबळ यांच्या माघारीमुळे समता परिषदेचे राज्य नेतृत्वावर प्रश्नचिन्ह -बैठकीत उमेदवारी करण्याचा आग्रह
Assured support for Arun Gawli daughter for mayor Controversy over Rahul Narvekar statement
अरुण गवळीच्या कन्येला महापौरपदासाठी पाठिंब्याचे आश्वासन; राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याने वाद
Sunetra Pawar
रायगड : सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या भेटीला…
Blood donation by AAP
केजरीवालांच्या समर्थनार्थ कोल्हापुरात आपतर्फे रक्तदान

सध्या माथाडी कामगारांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. बोर्ड उदध्वस्त होत आहेत. बोर्डामध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. बाजार समितीचे काम अन्यत्र हलविले जाते पण सरकारला याची तमा नाही. आतापर्यंत बहुतेक कामगार मंत्री हे उदयोगपतीच होते आणि आताचेही आहेत. मग कामगारांना न्याय कसा मिळणार ? अशी खंत संघटनेचे सरचिटणीस अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी व्यक्त केली. पुढे ते असेही म्हणाले की, अण्णासाहेबांनी केलेल्या ऐतिहासिक माथाडी कायद्याचे उदाहरण सभागृहात कामगारांसंदर्भात कोणताही कायदा पास करताना दिले जाते हेच खरे अण्णासाहेबांच्या अभेद्य चळवळीचे यश आहे. म्हणूनच आपण सर्वांनी संघटित होवून माथाडी कामगार चळवळीसमोर आता जी ज्वलंत आव्हाने उभी आहेत, ती नष्ट करण्यासाठी आपल्या संघटनेची ताकद अधिक बळकट करण्याची गरज आहे.

आणखी वाचा- ‘नैना’ ला विरोध करण्यासाठी शेतकरी सिडको भवनावर, भाजी भाकरीसह आंदोलकांची वाहनफेरीत

यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, “माथाडी कामगार चळवळ अत्यंत वाईट दिशेने आणि रस्त्याने वाटचाल करीत आहे . त्यासाठी ती बदलण्याकरीता आपण सगळयांनी एकजुटीने प्रयत्न करायला पाहिजेत. अण्णासाहेबांच्या ऐतिहासिक चळवळीचे अस्तित्व टिकवायचे असेल तर आपली अभेद्य एकजूट कायम राहिली पाहीजे असेही आव्हान त्यांनी उपस्थित कामगारांना केले. ते पुढे असे म्हणाले की, १९८२ साली महाराष्ट्रात अण्णासाहेबांच्या चळवळीचे मोठे वादळ निर्माण झाले. अनेक समाज्याच्या नेत्यांनी संघटना उभ्या केल्या मात्र अण्णासाहेबांनी मराठा समाजाची संघटना उभी करुन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात क्रांती घडविली त्याचे पडसाद ग्रामीण भागात मोठया प्रमाणात पसरले.”

ते पुढे म्हणाले, “अण्णासाहेबांची लढाई लोकांच्या प्रश्नांसाठी होती. त्याकाळी अण्णासाहेबांनी पेटविलेल्या वातीचा आज ज्वालामुखी झाला, विशेष म्हणजे अण्णासाहेबांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्यानंतर मंडळाच्या कार्याला चालना व गती देण्याचे काम त्यांनी केले. जवळपास ७० हजार उद्योजक निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. आताच्या शिंदें सरकारने ही आंदोलने केल्यानंतर अधिवेशनात या समस्या तोडगा काढण्याचे अश्वासन दिले,परंतु समस्या सोडवण्यासाठी सरकारला वेळच मिळत नाही केवळ बोळवण केली जात आहे. कोणत्याही सरकारला माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी रस नाही,त्यामुळे आज इतक्या वर्षांत पहिल्यांदाच कोणताही मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात आले नाही.”