वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत नोव्हेंबर मध्ये परदेशी मलावी हापूस दाखल झाला होता . दिवसेंदिवस याला मागणी वाढत आहे . बाजारात एक दिवस आड करून हजार ते बाराशे बॉक्स दाखल होत असून यंदाच्या हंगामात केवळ ६ हजार बॉक्स दाखल झाले आहेत. तेच मागील वर्षी १५ हजार बॉक्स दाखल झाले होते. एकंदरीत यंदा परदेशी मलावी हापूसची आवक घटली असून उत्पादन निम्म्यावर आले आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : अपघातास कारणीभूत ठरणारे उरणच्या चारफाटा चौकातील फलक हटविण्याची मागणी

हापूस म्हटला की रत्नागिरी, देवगड हापूसची गोडी डोळ्यासमोर येते. देवगडचा हापूस अवीट गोडीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र बाजारात परदेशातील मलावी हापूस देखील दाखल झालेला आहे. त्यामुळे ग्राहक देशी हापूस इतकेच परदेशी हापूसला पसंती देत आहेत. एपीएमसी बाजारात फेब्रुवारीमध्ये देशी हापूसचा हंगाम सुरू होतो. मात्र बाजारात नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये आफ्रिकन मलावी हापूस दाखल होतो. यंदा बाजारात २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर पर्यंत मलावी हापूस हंगाम असणार आहे. यंदा बाजारात आतापर्यंत ६ हजार बॉक्स दाखल झाले असून तेच मागील वर्षी १५हजार बॉक्स दाखल झाले होते . त्याठिकाणी मलावी हापूसचे उत्पादन कमी झाले आहे ,त्यामुळे बाजारात यंदा आवक घटली आहे. सोमवारपर्यंत हा मलावी हापूसचा हंगाम संपुष्टात येईल असे मत फळ बाजार संचालक संजय पानसरे यांनी व्यक्त केले आहे. बाजारात एक दिवस आड करून एक ते दीड हजार बॉक्स आवक होत असून ऐका बॉक्समध्ये ९ ते १६ नग असतात. बाजारात एक बॉक्स ३ हजार ते ४ हजार ५००रुपयांनी विक्री होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.