पनवेल : खांदेश्वर वसाहतीमधील प्रवेशव्दारावर भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी गुरुवारी खड्ड्यांचे पुजन केल्यानंतर शुक्रवारी सकाळी तातडीने पनवेल महापालिकेने संबंधित खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले. खडी, मुरूम माती टाकून हे खड्डे बुजविले जात होते. खांदेश्वर वसाहतीमधील रस्त्यांवर पडलेले सर्वच खड्ड्यांविषयी पालिकेने अशी सतर्कता दाखवावी अशी मागणी शेकापने केली आहे.

गुरुवारी दुपारी शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, पनवेलचे शेकापचे कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांनी खांदेश्वर वसाहतीमधील प्रवेशव्दारावरील अर्धाफूट खोल खड्ड्याचे हार व फुलांनी पुजन केल्याने या खड्ड्यांची चर्चा दिवसभर झाली. सर्वच वाहने या खड्ड्यात आपटली जात होती. पालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांनी या खड्ड्यांची वेळीच दखल न घेतल्याने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना रस्त्यावर उतरून यावर लक्ष वेधण्यासाठी उपरोधिक आंदोलन करावे लागले.

हेही वाचा – पनवेल बस आगारात उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांसाठी दंडुक्याचा उतारा

हेही वाचा – नवी मुंबईत पुन्हा पाणी गळती, आज संध्याकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालिकेने यावर शुक्रवारी सकाळपासून खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले. सिडको वसाहतींमधील रस्ते डांबरी असल्याने याठिकाणी पावसाळ्यात डांबरीकरण करणे शक्य नसल्याने दगडमाती मिश्रण टाकून हे खड्डे तात्पुरते बुजवले जात आहेत.