जगदीश तांडेल, लोकसत्ता

उरण : वर्षभरापासून प्रतीक्षा लागून राहिलेल्या उरण ते खारकोपर मार्गावरील लोकल सुरू करण्याचा मुहूर्त शुक्रवारी १२ जानेवारीला पक्का ठरला असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिली. त्यामुळे उरणकरांचे लोकलचे स्वप्न साकार होणार आहे. या घोषणेमुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

Fungible FSI scam, mhada
म्हाडातील फंजीबल चटईक्षेत्रफळ घोटाळा; आतापर्यंत मंजूर प्रस्तावांची छाननी होणार
२०१९ ते २०२४ मोदींचा मराठवाड्यातील पट पूर्णपणे बदलला !
lok sabha election 2024 level of promotion in Beed fell to caste of chief officers
बीडमधील प्रचाराचा स्तर प्रमुख अधिकाऱ्यांच्या जातीपर्यंत घसरला
chagan bhujbal
महायुतीच्या बैठकीत नाशिकचा तिढा सुटेल; छगन भुजबळ यांना विश्वास

१२ जानेवारीला उलवा नोड मधील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित अटलसेतु लोकार्पण कार्यक्रमातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृशप्रणालीद्वारे उरण ते खारकोपर लोकलचा हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे मागील २५ वर्षांपासून प्रतीक्षा लागून राहिलेले उरणकारांच्या रेल्वेचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

आणखी वाचा-नवी मुंबई : सार्वजनिक पार्किंगवर खासगी वाहनधारकांचा दावा

या रेल्वे मार्गावर लोकल सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी नवी मुंबई विमानतळ परिसरावर कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी करीत असतांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना दिली. तर भाजपनेही उरणकरांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण होणार असल्याच्या जाहिरातीचे फलक झळकाविले आहेत.

मार्गावरील अपूर्ण कामांना वेग

रेल्वेच्या मुख्य वाहतूक नियंत्रण अभियंता यांच्या निरक्षण विभागाने शनिवारी केलेल्या पाहणी नंतर अनेक त्रुटी निदर्शस आणल्या आहेत. यामध्ये उरण ते खारकोपर दरम्यानच्या उरण, द्रोणागिरी,न्हावा शेवा व रांजणपाडा या स्थानकांच्या परिसरातील वीज,रस्ते,जीने व इतर प्रवासी सुविधा पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या मार्गावरील अपूर्ण कामांना वेग आला आहे.

आणखी वाचा-मोदींच्या सभेपूर्वी आदित्य ठाकरे यांचा नवी मुंबईत एल्गार, दिघा स्थानक, पर्यावरणाच्या मुद्दयावरुन सरकारला घेरले

पहिली लोकल

उरण ते खारकोपर उद्घाटनाची पहिली लोकल ही उरण स्थानकातून खारकोपर अशी सोडण्यात येणार आहे. त्यासाठी रेल्वे विभागाकडून जोमाने तयारी सुरू असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.