शेखर हंप्रस , लोकसत्ता

नवी मुंबई : कोपरखैरणेत सार्वजनिक वाहनतळावर अतिक्रमण होत असून दुकानाला अडचण होऊ नये, आपल्या घरासमोर आपलेच वाहन रस्त्यावर उभे केले जावे, आमच्या गल्लीत आमच्याच गाड्या उभ्या असाव्यात या वृत्तीने आता सार्वजनिक पार्किंगच्या ठिकाणी कुंड्या, मोठमोठे दगड ठेवणे सुरू झाले आहे. त्यात काही लोकांनी तर स्वत:च ‘नो पार्किंग’चे अनधिकृत फलक लावले आहेत.

Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
pune ring road,
पुणे : रिंगरोडमध्ये परदेशी कंपन्यांना रस
smart farm system marathi news
शेतकऱ्यांसाठी ‘स्मार्टफार्म प्रणाली’… कशी ठरणार उपयुक्त?
Navi Mumbai Municipal Corporation
३१ मार्चपूर्वी मालमत्ता कर भरण्याचे नवी मुंबई महापालिकेचे आवाहन

धक्कादायक म्हणजे हे सर्व सार्वजनिक अर्थात रस्त्याच्या कडेला महापालिकेने दिलेल्या अधिकृत पार्किंगच्या जागेत होत आहे. त्यामुळे अगोदरच पार्किंगची वानवा असलेल्या या नोडमध्ये वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

आणखी वाचा-मोदींच्या सभेपूर्वी आदित्य ठाकरे यांचा नवी मुंबईत एल्गार, दिघा स्थानक, पर्यावरणाच्या मुद्दयावरुन सरकारला घेरले

पार्किंगची सर्वाधिक समस्या कोपरखैरणे नोडमध्ये आहे. वाहनतळावरून आता या ठिकाणी अनेक छोटेमोठे वाद होत आहेत. अनधिकृत बांधकाम हा शब्दप्रयोग नित्याचाच झाला आहे. मात्र सार्वजनिक पार्किंगच्या ठिकाणी अनधिकृत कब्जा तेही खासगी गाडीसाठी हा प्रकार कोपरखैरणेत पाहण्यास मिळतो आहे. याकडे मनपा अतिक्रमण विभागाची डोळेझाक होत असल्याने असे प्रकार वाढत आहेत.

कोपरखैरणेतील ज्ञान विकास शाळेसमोर तर मोठमोठे दगड टाकून पार्किंग करता येऊ नये अशी सोय केली आहे. या ठिकाणी सार्वजनिक अधिकृत पार्किंग असताना ‘नो पार्किंग’चा फलक लावण्यात आला आहे. सेक्टर १४ येथील लक्ष्मीनारायण मंदिर शेजारी एक कार्यालय असून त्या समोर सार्वजनिक पार्किंग आहे. मात्र या परिसरातील काही रहिवाशांनी सार्वजनिक पार्किंगच्या ठिकाणी चक्क बॅरिकेड्स लावले आहेत.

आणखी वाचा- महाराष्ट्राने किती अन्याय सहन करायचा ? – आदित्य ठाकरे

वाशीतही पे अॅण्ड पार्कच्या जागी कुंड्या प्रकार

अशा प्रकारचे लोण हळूहळू सर्वत्र होत आहे. कोपरखैरणे नंतर पार्किंगची समस्या सर्वाधिक वाशीला भेडसावत आहे. वाशी सेक्टर १७ येथील जे. के. चेंबर या व्यावसायिक इमारतीखाली असलेल्या एका किराणा मालाच्या दुकानासमोर तर पे अँड पार्कच्या जागेतील पार्किंगच्या जागेवर कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. कुंड्या ठेवणाऱ्या व्यक्तीची गाडी आली की त्याच्याकडील कामगार या कुंड्या बाजूला करत असतात अशी माहिती येथील एका फळ विक्रेत्याने दिली.