सहा करोना काळजी केंद्रे खुली, प्राणवायूनिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन

नवी मुंबई : शहरात करोना रुग्णवाढीचा वेग कायम असून शुक्रवारी शहरात अडीच हजार करोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने आरोग्य सुविधांत वाढ केली आहे. दोन दिवसांपूर्वी तीन करोना काळजी केंद्रे सुरू केली होती. शुक्रवारी आणखी तीन केंद्रे सुरू केली आहेत. पहिल्या लाटेत करोना काळजी केंद्रे बंद करून तेथील आरोग्य व्यवस्था हलवण्यात आल्याने दुसऱ्या लाटेत रुग्णवाढीनंतर प्रचंड गैरसोय झाली होती. हा अनुभव पाठीशी असल्याने दुसरी लाट ओसरल्यानंतर प्रशासनाने १४ काळजी केंद्रे बंद केली, मात्र तेथील आरोग्य व्यवस्था कायम ठेवली होती. त्यामुळे आता रुग्णवाढीनंतर तात्काळ आरोग्य व्यवस्था खुली करता येत आहे. निर्यात भवन, राधास्वामी सत्संग भवन, महिला करोना रुग्णांसाठी ईटीसी केंद्र बधवारपासून सुरू करण्यात आली होती. शुक्रवारी तीन केंद्रे सुरू करण्यात आली.

water problems in Mira Bhayander area
मिरा-भाईंदरमध्ये भीषण पाणीटंचाई; दोन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद, नागरिकांचे हाल
condition of primary health centers in state is pathetic beds in rural hospitals are utilized only at 40 percent capacity
राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था दयनीय, ग्रामीण रुग्णालयांतील खाटांचा वापर केवळ ४० टक्के क्षमतेनेच
Mumbai temperature at 37 degrees
मुंबईचा पारा ३७ अंशावर
govandi shatabdi hospital marathi news
मुंबई: गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात ईसीजी तंत्रज्ञांअभावी रुग्णांचे हाल

सुरू केलेली काळजी केंद्रे

वारकरी भवन, बेलापूर

मयूरेश प्लॅनेट, सीबीडी

अण्णासाहेब पाटील, कोपरखैरणे