scorecardresearch

नवी मुंबई : एपीएमसी बाजारात स्ट्रॉबेरीची आवक वाढली; दरात घसरण

स्ट्रॉबेरी हे थंडीत पिकणारे फळ असल्याने त्याचा मुख्य बहर डिसेंबर, जानेवारी महिन्यांत असतो. हा बहर जून महिन्यापर्यंत सुरू राहतो.

नवी मुंबई : एपीएमसी बाजारात स्ट्रॉबेरीची आवक वाढली; दरात घसरण
संग्रहित छायाचित्र / लोकसत्ता

अवकाळी पावसाने स्ट्रॉबेरीचा हंगाम लांबला असून बाजारात आता स्ट्रॉबेरी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. डिसेंबरमध्ये स्ट्रॉबेरी मोठ्या प्रमाणावर दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. बाजारात आता दोन ते अडीच हजार क्रेट दाखल होत आहेत. एपीएमसी घाऊक बाजारात दिवसागणिक स्ट्रॉबेरीची आवक वाढत असल्यामुळे त्यांचे बाजारभाव उतरलेले पाहावयास मिळत आहे. मागील महिन्यात ६०० ते ८०० रुपये प्रतिकिलो मिळणारी स्ट्रॉबेरी आता ३२० ते ६०० रुपये प्रतिकिलो उपलब्ध आहे. मात्र स्ट्रॉबेरीला गोडवा कमी असून २० डिसेंबर नंतरच मधुर स्ट्रॉबेरी चाखायला मिळणार आहे.

अलीकडच्या काळात कमी क्षेत्रात अधिक आर्थिक उत्पन्न देणारे वाई, पाचगणी, महाबळेश्वर येथे येणाऱ्या पर्यटकांची मागणी असलेल्या ‘स्ट्रॉबेरी’ पिकाची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल जास्त वाढला आहे. नाशिक मध्ये हे स्ट्रॉबेरी चे उत्पादन घेतले जात आहे .एपीएमसी बाजारात पाचगणी महाबळेश्वर येथील दोन ते अडीच हजार क्रेट नाशिक येथील ७०० ते ९०० क्रेट स्ट्रॉबेरी दाखल होत आहेत . सध्या स्ट्रॉबेरी आवक वाढत त्यामुळे दरात घसरण झाली आहे.

हेही वाचा: नवी मुंबई : विवाहितेची मुलासह सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

स्ट्रॉबेरी हे थंडीत पिकणारे फळ असल्याने त्याचा मुख्य बहर डिसेंबर, जानेवारी महिन्यांत असतो. हा बहर जून महिन्यापर्यंत सुरू राहतो. डिसेंबर, जानेवारी महिन्यांत सर्वाधिक स्ट्रॉबेरी बाजारात विक्रीसाठी येत असली तरी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला वाशीच्या एपीएमसी बाजारात स्ट्रॉबेरी दाखल होण्यास सुरुवात होते. परंतु यंदा पाऊस लांबल्याने हंगामालाही उशिरा सुरुवात होत आहे. स्ट्रॉबेरी खाण्याबरोबरच आयस्क्रीम, शीतपेय, चॉकलेट यामध्ये मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी फ्लेवरचा उपयोग होतो. त्यामुळे बाराही महिने स्ट्रॉबेरी ला मागणी असते.

हेही वाचा: नवी मुंबईतील बेकायदा बांधकामांना पालिकाच जबाबदार! तोडक कारवाईत अधिकारीच जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र

विशेषतः हंगामा दरम्यान अधिक मागणी असते. त्यामुळे महाबळेश्वर व वाई परिसरात कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न देणारे पीक म्हणून स्ट्रॉबेरीची लागवड मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. त्याचबरोबर नाशिक मध्ये ही लागवड केली जात आहे. आवक वाढत असल्याने बाजारात मागील महिन्याच्या तुलनेत दर आवाक्यात आहे अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 15:59 IST

संबंधित बातम्या