कोकण रेल्वे कामगारांनी सीबीडी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढला होता. भारतीय रेल्वेत ज्याप्रमाणे सानुग्रह अनुदान (बोनस) देण्यात आले त्याच धर्तीवर आम्हालाही  देण्यात यावे ,अशी प्रमुख मागणी करण्यात आली होती. या हल्लाबोल मोर्चात चार संघटनांनी सहभाग घेतला होता.

हेही वाचा- नवी मुंबई: मोरा रो रो जेट्टीचा खर्च दहा कोटींनी वाढला

कोकण रेल्वेच्या कार्यालयावर आज हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. कोकण रेल्वे मध्ये कार्यरत असणाऱ्या चार संघटनांनी एकत्रित येत हे आंदोलन केलेय. दसऱ्याच्या आधी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८  दिवसांचा सानुग्रह अनुदान  जाहीर केले होते. त्यानुसार १७  हजार ९५१  रुपये बोनस मिळणे अपेक्षित होते. मात्र, कोकण रेल्वे आपल्या कर्मचाऱ्यांना हा सानुग्रह अनुदान देण्यास नकार दिला आहे. कोकण रेल्वेचे कर्मचारी पण तेच काम करतात जे भारतीय रेल्वेचे कर्मचारी करतात. असे असताना सानुग्रह अनुदान  देण्यास नकार देत असल्याने कोकण रेल्वे कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी सानुग्रह अनुदान न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

हेही वाचा- दि.बा. पाटलांच्या नावाने २०२३ ला उरणमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होणार

सुभाष मुळगी (अध्यक्ष कोकण रेल्वे कंपनी एम्पलोंइज युनियन) कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देता येत नाही कारण कोकण रेल्वे तोट्यात असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात या रेल्वेत ५३ टक्के विविध सवलती दिल्या जातात. ही सवलत  देण्याचा निर्णय रेल्वे विभागाचा आहे. त्यामुळे रेल्वे तोट्यात येत आहे. प्रत्यक्षात हा निर्णय घेतला नसता तर कोकण रेल्वे प्रचंड फायद्यात असती कोकण रेल्वे कामगार जे काम करतात तेच काम भारतीय रेल्वे कर्मचारी करतात. त्यामुळे दोन्हीत फरक करू नये.