पनवेल : मार्चअखेरपर्यंत थकीत कर भरल्यास दंड टाळता येण्यासाठी पनवेल महापालिकेतील शेकडो करदाते मालमत्ता कराचा भरणा करत असून गुरुवारी एकाच दिवशी तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक कर पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. ही आजपर्यंतची सर्वांत उच्चांकी वसुली झाल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

आर्थिक वर्ष मार्च महिन्यात संपत असल्याने करदाते कर भरत आहेत. २०२३-२४ या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत ३३३ कोटी मालमत्ता कर जमा झाला आहे. पालिकेने करवसुलीसाठी नेमलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमुळे ही वसुली प्रभावीपणे होत आहे.

400 lakh crore market cap milestone of Mumbai Stock Exchange
विश्लेषण : ७५ हजारांचे शिखर… ४०० लाख कोटींचे बाजारभांडवल… शेअर बाजार आणखी किती तेजी दाखवणार?
Delayed purchase of passenger vehicles by 3 lakh 22 thousand 345 customers in the month of March
प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, मार्च महिन्यात ३ लाख २२ हजार ३४५ ग्राहकांकडून खरेदी लांबणीवर
Navi Mumbai Municipal Corporation, Achieves, Record Property Tax, Collection, 716 Crore , financial year, 2023-2024,
नवी मुंबईत ७१७ कोटी मालमत्ता कर जमा, गतवर्षीपेक्षा ८३.६६ कोटी जास्त करवसुलीचा दावा
380 crore fraud case
३८० कोटी फसवणूक प्रकरण : आरोपीचा तीन राज्यांमध्ये १२ दिवस पाठलाग, अखेर उत्तराखंड येथून अटक

हेही वाचा – …तरीही नवनीत राणा खासदार, पण रश्मी बर्वे मात्र बाद

पनवेल महापालिकेमध्ये साडेतीन लाख करदाते असून सिडको वसाहत क्षेत्र आणि ग्रामीण भागातून पालिकेच्या तिजोरीत १२०० कोटी रुपये थकीत मालमत्ता कर जमा होणे शिल्लक आहे. औद्याोगिक वसाहत आणि सिडकोचे रहिवास क्षेत्र यांमधून आतापर्यंत ३३३ कोटी रुपये जमा झाले आहेत. यामध्ये १२४ कोटी ५७ लाख रुपये खारघर वसाहतीच्या परिसरातून जमा झाल्याची माहिती पालिकेच्या जनसंपर्क विभागाने गुरुवारी ठळकपणे प्रसिद्ध केली. याच खारघर वसाहतीमधील सामाजिक संस्थेने (खारघर फोरम) उच्च न्यायालयात जनहित याचिका केली आहे. अद्याप या याचिकेचा निर्णय लागला नसल्याने करदाते संभ्रमात आहेत. पालिकेचे तत्कालिन आयुक्त गणेश देशमुख यांनी करदात्यांनी कर भरावा असे आवाहन केले आहे.

उच्च न्यायालयाने कर कमी केल्यास किंवा कर माफ केल्यास पुढील आर्थिक वर्षात रहिवाशांनी भरलेल्या कराची रक्कम वळती करू, असे आश्वासन दिले आहे.

हेही वाचा – बडे नेते माझ्यासोबत असल्याने बाजू उजवी; यश निश्चितपणे मिळणार; संजय मंडलिक यांचा दावा

हेही वाचा – “नाना पटोलेंनी पैसे घेऊन डॉ. प्रशांत पडोळेंना उमेदवारी दिली,” काँग्रेसच्या माजी आमदाराचा आरोप; म्हणाले, “भाजप उमेदवाराला…”

आतापर्यंत ४५० हून अधिक जप्तीपूर्व नोटिसा

पालिका प्रशासनाने थकीत कराच्या रकमेशिवाय पालिकेत विकास शक्य नसल्याने नागरिकांनी कर भरावा अशी भूमिका घेऊन आतापर्यंत विविध नोडमध्ये सुमारे ४५० हून अधिक जप्तीपूर्वीच्या नोटिसा तसेच १६ वॉरंट नोटीसांचे वाटप थकबाकीदार मालमत्ताधारकांना केले आहे. दरम्यान मालमत्ता कर न भरल्यास थकीत करदात्यांच्या शास्तीमध्ये दरमहा २ टक्क्यांची वाढ होत आहे.