संतोष जाधव

नवी मुंबई : नेरुळ येथील सुप्रसिद्ध वंडर्स पार्कमध्ये प्रवेश करणे तसेच पार्कमधील विविध खेळांची उपकरणे (राइड्स) वापरण्यासाठी आता आबालवृद्धांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.

News About Salman Khan
Salman Khan Threat : सलमान खानला धमकी देणाऱ्या तरुणाला ‘या’ राज्यातून करण्यात आली अटक, ५ कोटींची मागितली खंडणी
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
kalyan Dombivli firecracker shop
कल्याण-डोंबिवलीतील वर्दळीच्या रस्त्यांवरील फटाक्यांचे मंच हटवा, प्रवाशांसह वाहन चालकांची मागणी
Chief Minister Eknath Shinde started campaigning for assembly elections in Mumbai print politics news
मुंबई झोपडीमुक्त करणार- मुख्यमंत्री
jewellery worth two lakh stolen from woman at swargate st bus depot
दिवाळीत एसटी स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट; स्वारगेट एसटी स्थानकात महिलेकडील दोन लाखांचे दागिने लंपास
diwali boost for vehicle sales in pune car buying rise during diwali
अबब! ५५ हजार…
Over 150 prisoners in the state will be released from jail
राज्यातील दीडशेवर कैद्यांची होणार कारागृहातून सुटका; नागपूर आणि पुण्यातील…
Mhada mumbai
म्हाडा मुंबई मंडळ सोडत २०२४ : सुमारे ४४२ घरांसाठी प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी

नवी मुंबई शहरातील लँडमार्क म्हणून वंडर्स पार्क ओळखले जाते. या वंडर्स पार्कचे नूतनीकरण केल्यानंतर त्याचे उद्घाटन ३० जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. आता पार्कचे तिकीटदर वाढवले जाणार असून काही दिवसांतच पार्कचे तिकीटदर वाढणार असल्याची माहिती वरिष्ठ पालिका अधिकाऱ्यांनी लोकसत्ताला दिली. तर या तिकीटदर वाढवण्यावरुन वादंग होणार असल्याचे चित्र आहे. या पार्कमध्ये प्रवेशासाठी सध्या ५ ते १२ वयोगटासाठी २५ रुपये तिकीट असून ते ४० रुपये करण्यात येणार आहे.तर दुसरीकडे प्रौढांसाठीचे तिकीट दर ३५ रुपयांवरुन ५० रुपये करण्यात येणार आहेत.

हेही वाचा… पनवेल : सिडकोच्या जागेवर राडारोडा टाकणाऱ्यास अटक

नवी मुंबई शहराबरोबरच उरण, पनवेल, ठाणे तसेच मुंबई येथूनही वंडर्स पार्कला अबालवृध्द मोठ्या प्रमाणात येत असतात. शनिवार व रविवारी हे पार्क गर्दीने फुलून जात असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्कमध्ये नव्या खेळाच्या राईड्स बसवल्या असून सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या पार्कमध्ये विविध दुरुस्तीची तसेच नव्याने सुरु करण्यात आलेल्या आकर्षक खेळांची व्यवस्था असल्याने गर्दी सतत वाढत आहे. करोनाकाळापासून जवळजवळ ३ वर्षापेक्षा अधिक काळ सर्वसामान्यांसाठी हे पार्क बंद असल्यामुळे कधी एकदा उद्यान पाहतो यासाठी लहान मुले हट्ट करुन पालकांना घेऊन येतात.

हेही वाचा… कल्याण तळोजा मेट्रो १२ च्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार

नव्या रूपात सुरू झालेल्या लेझर शो व म्युझिकल फऊंटनची धमाल अनुभवायला मिळत असून लेझर शो, फाऊंटनमध्येच शिवछत्रपतींच्या गाण्यावर रंगीत पाण्यामध्येच विविध आकार पाहता येत आहेत. तसेच संगीताच्या तालावर नृत्याचा तालही धरता येत आहे .याच पार्कमध्ये २३ कोटी रुपये खर्चातून आकर्षक राईड्स बसवण्यात आल्या असून त्याचा आनंद घेण्यासाठी दर शनिवार रविवारी येथे गर्दी होते. वाढणाऱ्या तिकीट दराबाबत पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याशी संपर्क झाला नाही. परंतू वंडर्स पार्कच्या तिकीटदरावरून वादंग होण्याची शक्यता आहे.

वंडर्स पार्कमध्ये नव्याने अद्यायावत खेळणी उपकरणे बसविल्यानंतर विजेवर आधारित अनेक गोष्टींसाठी स्वतंत्र व्यवस्थाही करण्यात आली होती.

प्रवेश आणि तिकीट वाढीव

राईड्स दर

वय ५ ते १२, २५ – ४०

प्रौढांसाठी ३५, ५०

राईडसाठी २५, ५०

टॉय ट्रेन २५, २५

प्रशासनाने वंडर्स पार्कचे दर वाढवण्याचा घाट घातला आहे. दर वाढवले तर त्याला तीव्र विरोध करण्यात येईल. पालिका ही उत्पन्न कमावण्याची कंपनी नसून नागरिकांसाठी हे पार्क माफक दरात उपलब्ध असले पाहिजे, अन्यथा वंडर्स पार्कला टाळे ठोकू. – रवींद्र इथापे, माजी भाजप नगरसेवक

वंडर्स पार्कसाठी स्मार्टकार्ड कधी?

वंडर्स पार्कमध्ये प्रवेश करण्यासाठी शनिवारी व रविवारी होणाऱ्या गर्दीमुळे अनेक वादाचे प्रसंग निर्माण होत असल्याने पालिकेने स्मार्ट कार्डची सुविधा देण्याची तयारी केली होती. जगभरात सर्वत्र डिजिटल व्यवहार सुरू असून स्मार्ट कार्डचा वापर केल्यास तिकीटांसाठीच्या रांगा बंद होऊन पारदर्शक व्यवहारही होतील. त्यामुळे पालिकेने याबाबतही अंमलबजावणी केली पाहिजे अशी मागणी सातत्याने पर्यटक नागरिकांकडून होत आहे.

नवी मुंबईतील वंडर्स पार्कचे दर वाढवण्याचा निर्णय झाला असून त्याची अंमलबजावणी पुढील काही दिवसांत करण्यात येईल. – संजय देसाई, शहर अभियंता