नवी मुंबई : महानगरपालिकेने मागील आठवड्यात इंडियन स्वच्छता लीगमध्ये ‘युथ वर्सेस गार्बेज’ या अंतर्गत स्वच्छता आणि कचरा वर्गीकरणाची जनजागृती करण्यासाठी मोठ्या संख्येने तरुणांना सहभागी केले होते . याची दखल घेत केंद्र सरकारकडून घेण्यात आली असून नवी मुंबई महानगरपालिका १० लाखाहून अधिक लोकसंख्येच्या शहरात युवकांना एकत्रित आणणारे नवी मुंबई शहर देशात नंबर वन ठरले आहे. दिल्ली येथे केंद्र सरकारच्यावतीने नवी मुंबईला पुरस्काराने गौरविण्यात आले आहे . यावेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, अतिरिक्त शहर अभियंता संजय देसाई , घनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे तसेच उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार हे उपस्थित होते.  

बेलापूर येथील रोजी राजीव गांधी मैदानात दि.२२ ऑक्टोबर रोजी इंडियन स्वच्छता लीगचे आयोजन करण्यात आले होते. तसेच पामबीच मार्गावर तिरंगा घेत मानवी साखळी बनवण्यात आली होती. वाशी मिनी सिशोर येथे  तृतीयपंथांकडून स्वच्छता करण्यात आले होती. राजीव गांधी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या या इंडियन स्वच्छता लीगला  ५३ हजार युवकांनी सहभाग नोंदवला होता.  यावेळी उपस्थित अभिनेता मकरंदअनासपुरे  आणि नवी मुंबई संघाचे कर्णधार गायक शंकर महादेवन यांनी देखील या स्वच्छता प्रबोधनाच्या कार्यक्रमात युवकांनी नोंदवलेल्या सहभागाला दाद दिली होती.  मकरंद अनासपुरे यांनी युवकांना एकत्रित आणून स्वच्छता महत्व पटवून देणारी नवी मुंबई महानगरपालिका ही एक आदर्शवत संदेश देत आहे , असे मतही यावेळी व्यक्त केले होते. तसेच या स्वच्छता लीग दरम्यान नवी मुंबईच नंबर वन ठरणार असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता. अखेर या इंडियन स्वच्छता लीग मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने १० लाखाहून अधिक लोकसंख्येच्या शहरात प्रथम स्थान पटकावले आहे.

Navi Mumbai, Escalating Traffic, traffic jam, airoli, belapur, Illegal Parking, traffic jam in Navi Mumbai, traffic jam belapur, traffic jam airoli, illegal parking in navi mumbai, marath news, two wheelar parking, four wheelar parking, navi mumbai citizens,
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ऐरोलीपासून बेलापूरपर्यंत वाहनतळांची सुविधा अपुरी
percentage of voting in Mumbai,
मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे शहरांतील मतदानाचा टक्का वाढणार कसा ? मतदारांचा निरुत्साह दूर करण्यावर निवडणूक आयोगाचा भर
mumbai, bmc, deficit 2100 crore, three days, left, tax collection, financial year end,
मालमत्ता करवसुलीसाठी मुंबई महानगरपालिकेकडे केवळ तीन दिवस शिल्लक, करवसुलीत २१०० कोटींची तूट
property tax, metro contractors
मेट्रोच्या कंत्राटदारांनी थकवला ३७५ कोटी रुपये मालमत्ता कर, मुंबई महानगरपालिकेची थकबाकीदारांना नोटीस