नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या ऐरोली दिघा ते बेलापूरपर्यंतच्या नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सातत्याने वाढत्या वाहनांचा बोजा पडत असताना दुसरीकडे बेशिस्त पार्किंगची वाढती बेपर्वाई यामुळे शहरात सातत्याने वाहतूक व्यवस्थेचा खेळखंडोबा होत आहे.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, नेरुळ नवी मुंबई येथे असून नव्या वाहनांची नोंदणी सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे शहराची भौगोलिक स्थिती व पालिका शहरी व ग्रामीण भागातही पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली असून हवी तशी व जागा मिळेल तेथे पार्किंगमुळे वाहतूकव्यवस्थेचा बोजवारा उडत आहे.

हेही वाचा…शीव-पनवेल महामार्गावर ‘हप्ते वसुली’, बस चालक संघटनेचे पोलीस उपायुक्तांना निवेदन

शहरात हवे तिथे व हवी तशी वाहन पार्किंग करण्याचे वाढत असून अशा वाहनचालकांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. शहरात मागील वर्षात ३३,३६६ वाहनांची नोंद झाली होती त्यात वाढ होऊन यंदाच्या आर्थिक वर्षात नव्या वाहनांची संख्या ३६ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरावरील वाहनांचा बोजा सातत्याने वाढत असून शहरातील पार्किंगचा प्रश्न वर्षानुवर्ष अधिक जटील होत चालला आहे. त्यातच शहरातील बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. मुळातच शहरातील जुन्या नियोजनानुसार करण्यात आलेले पार्किंगची सुविधा अत्यंत तोकडी पडत आहे कारण दुसरीकडे नव्या वाढनांची संख्या वाढतच आहे.

सोसायटीतील एका पार्किंग सुविधेसाठी ३ लाखांच्यापेक्षा अधिक पैसे द्यावे लागत आहे. त्यामुळे हवे तिथे बेशिस्तपणे पार्किंग करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. काही विभागात तर रस्त्याच्या कडेचे पार्किंग हक्काचे पार्किंग असल्याचे सांगत अरेरावीचे प्रकार वाढत आहेत. अंतर्गत वाहतुकीबरोबरच वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच जेएनपीटी बंदर, होऊ घातलेला विमानतळ तसेच अटल सेतूमुळे वाहनांची वाढती संख्या वाढतच चालली आहे. त्याचा परिणाम शहरातील रस्ते वाहतूकीवर होऊ लागला आहे. शहरात पार्किंगच्या जागा कमी असताना वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे शहरात सर्वच उपनगरांत दिवसेंदिवस दुतर्फा पार्किंग पाहायला मिळत आहे.

हेही वाचा…एमएमआरडीए’च्या अधिसूचनेला २० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या हरकती

चारचाकी वाहने, मीटर टॅक्सी, रिक्षा, बस, शालेय बस, खासगी सेवा वाहने,रुग्णवाहिका, ट्रक, टँकर, खाजगी चारचाकी, सार्वजनिक तीनचाकी वाहने, ट्रेलर्स, अन्य शासकीय वाहने अशा विविध प्रकारच्या वाहनात वाढ होत असल्याने घराबाहेर पडले तर वाहन पार्किंग करायचे कुठे असा प्रश्न पडत आहे.

वाढत्या वाहनांमुळे शहरातील पार्किंगची समस्या अधिक बिकट होत आहे. वाढत्या वाहनांमुळे बेशिस्त पार्किंगची समस्या अधिक बिकट होऊ लागली आहे. त्यामुळे बेशिस्त पार्किंगचा मोठा प्रश्न समोर येऊ लागला आहे.तर शहरात वाहतूक पोलिसांना वाहतूक व्यवस्थेसाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

हेही वाचा…नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना

दुचाकी किंवा चारचाकी यापैकी कोणतेही वाहन घेऊन जायचे असेल तर पार्किंग करण्यासाठी जागा मिळेल का असा प्रश्न सामान्य नागरिकाला पडतो. त्यामुळे रस्त्यावर जिथे गाडी लावायला जागा मिळेल ती आपलीच म्हणत बेकायदा पार्किंग होत आहे. त्यामुळे वाहन घराबाहेर काढण्यापूर्वी विचार करावा लागतो. – सुकृत नाईक, रहिवासी

मागील काही दिवसांपासून वाहननोंदणी वाढली आहे वाहनांची नोंदणी सातत्याने वाढत आहे. शहरात बेशिस्त पार्किंगची समस्या असून संबंधित विभागाकडून कार्यवाही करण्यात येत आहे. – हेमांगिनी पाटील, उपप्रदेशिक अधिकारी नवी मुंबई

हेही वाचा…ठाणे – बेलापूर वाहतूक कोंडी, घणसोली स्टेशन समोर ट्रक पलटी

शहरात वाढत्या वाहनांमुळे पार्किंगचा प्रश्न निर्माण होत असून नागरिकांनीही याबाबत अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. हवे तिथे वाहन पार्क करु नये. नवी मुंबईकर नागरिक सजग असून नागरिक शिस्तीचे पालन करत असल्याचे पाहायला मिळत आहे.– तिरुपती काकडे, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग