नवी मुंबई : मराठा आरक्षणासाठी खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून या कामाचा अतिरिक्त बोजा शिक्षकांवर पडला आहे. सर्वेक्षणाची जबाबदारी पालिकेच्या ठोक मानधनावरील शिक्षकांवर सोपवण्यात आली असून दुसरीकडे कायम शिक्षकांना या कामापासून दूर ठेवण्यात आल्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकीकडे शाळा तर दुसरीकडे शाळेतील प्रजासत्ताक दिनानिमित्त करण्यात येणारे विविध उपक्रम, कवायती यांची तयारी सुरू असताना या कामाचा अतिरिक्त बोजा शिक्षकांवर पडला असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असताना शेवटच्या टप्प्यातच शासनाला सर्वेक्षणाची जाग कशी आली असा संताप शिक्षकांमार्फत करण्यात येत आहे.

हेही वाचा…नवी मुंबईतील भाजयुमो कार्यकारिणीत घराणेशाही

मराठा सर्वेक्षणाचे काम घरोघरी जाऊन करावयाचे असून मोबाइलवर देण्यात आलेल्या अॅपवर याची माहिती संकलित करायची आहे. सर्वेक्षणात मराठा कुटुंबे असलेल्या ठिकाणी जवळजवळ १५० पेक्षा अधिक प्रश्न विचारायचे असून एका शिक्षकाला २०० ते ३०० घरेही सर्वेक्षणासाठी दिली जात आहेत. या संपूर्ण सर्वेक्षणाचा परिणाम शालेय कामकाजावर झाला असून आजपासून सुरू झालेल्या सर्वेक्षणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ लागला आहे. तर दुसरीकडे मराठा कुटुंबाचे सर्वेक्षणही अत्यंत महत्त्वाचे व जोखमीचे काम आहे.

त्यातच नवी मुंबई महानगरपालिकेत कायम असलेल्या शिक्षकांना सर्वेक्षणाच्या नेमणुका नसून ठोक मानधनावर काम करणाऱ्या शिक्षकांना नेमणूका दिल्या आहेत. तसेच ज्या भागात या शिक्षकांची शाळा आहे. त्या शाळेच्या परिसरातील मराठा सर्वेक्षणाची जबाबदारी दिली नसून दुसऱ्याच विभागात सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे दुसऱ्या अनोळखी विभागात सर्वेक्षण करणे शिक्षकांना मोठे जिकिरीचे होत असल्याचे सांगितले.

हेही वाचा…२५ जानेवारीला सर्व बाजार समिती राहणार बंद – एपीएमसी प्रशासन 

शिक्षकांची नाराजी

सध्या प्रजासत्ताक दिनाची शाळाशाळांमधून तयारी सुरू असताना अचानक आलेल्या या सर्वेक्षणामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे. तर पालिकेमध्ये कायम, ठोक मानधनावर, तासिका पध्दतीने शिक्षक कार्यरत असून त्यातील फक्त ठोक व तात्पुरत्या स्वरूपातील शिक्षकांनाच हे सर्वेक्षणाचे काम दिल्याने शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात शासनाच्यावतीने देण्यात आलेले काम असून सर्व राज्यभरात सर्वेक्षण सुरू आहे. फक्त ठोक मानधनावरील नव्हे तर कायम व सर्वच शिक्षकांच्या या कामासाठी नेमणुका केल्या आहेत. – अरुणा यादव, शिक्षणाधिकारी, नवी मुंबई महापालिका

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai municipal corporation has given survey work of maratha reservation to teachers psg
First published on: 24-01-2024 at 12:52 IST