नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. हे रॅकेट ऑन लाईन चालत असल्याने आता पर्यंत पोलिसांच्या नजरेपासून दूर होते. त्यात मुख्य आरोपी असलेली सतरा वर्षीय युवती अत्यंत सावधानता पाळत हे रॅकेट चालवत असल्याने तिने पोलिसांच्या बनावट ग्राहकालाही तब्बल अडीच महिने झुरवत ठेवले होते. 

मुंबई म्हणजे मायानगरी येथे असलेल्या चित्रपट आणि गेल्या काही दशकापासून तेजीत असलेल्या छोट्या पडद्याचे ग्रॅमर युवक युवतींना आकर्षित करीत असते. त्यात मागचा पुढचा विचार न करता अनेक युवती या मायनगरीत येऊन धडकतात व स्थिरस्थावर होई पर्यंत “स्ट्रगलर” या गोंडस उपधीसह वावरतात. यातील सर्वच मुख्य नायिका बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून आल्या तरी अनेकजणी नाईलाजाने एक्ट्रॉ मध्ये काम करतात. मात्र घरभाडे लागणारा खर्च त्यात शरीर सौष्ठव ठेवण्यासाठी जिम आणि खाण्यापिण्याच्या अतिरिक्त खर्च भागवण्या इतपत पैसे नसल्याने वाम मार्गाचा अवलंब करतात. अशाच युवतींना आपल्या जाळ्यात ओढणाऱ्यांचे अनेक रॅकेट जुहू अंधेरी लोखंडवाला भागात कार्यरत आहेत. अशाच एका रॅकेटचा पर्दा फाश नवी मुंबई पोलिसांनी केला.

Request for application from Reserve Bank to Small Finance Bank for conversion to regular banks
नियमित बँकांमध्ये रूपांतरणासाठी रिझर्व्ह बँकेकडून लघुवित्त बँकाकडे अर्जाची मागणी
Competition among 7 companies under incentive scheme for ACC production
‘एसीसी’ उत्पादनासाठी प्रोत्साहन योजनेअंतर्गत ७ कंपन्यांमध्ये चढाओढ
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
The debut of Bharti Hexacom itself gave investors a return of 43 percent
‘भारती हेक्साकॉम’चा पदार्पणालाच गुंतवणूकदारांना ४३ टक्क्यांचा परतावा

हेही वाचा… दर दोन तासांनी हवा गुणवत्ता तपासणी; नवी मुंबई महापालिकेची प्रदूषण नियंत्रणासाठी लगबग

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल आहिरे यांना एक माहिती मिळाली की अंधेरी येथून एक महिला मॉडेल, टिव्ही कलाकारांना वेश्यागमनासाठी पुरवते. या रॅकेटचा माग काढला  टिन्डर हे डेटिंग अँप  द्वारा ती संपर्क करते ही माहिती समोर आली. त्याच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहक बनून  आरोपीशी संपर्क साधला. मात्र आरोपीने हा ग्राहक अनोळखी असल्याने सुमारे दोन महिने केवळ चॅटिंग वर घालवले. मात्र तरीही संयम ठेवत आहेर यांनी बनावट ग्राहक द्वारा हे चॅटिंग करणे सोडले नाही. अखेर प्रथियश खाजगी वाहिनीतील एका गाजत असलेल्या मालिकेतील काम करणाऱ्या आणि काही मॉडेल्सचे फोटो आरोपीने  पाठवले. त्यातील चार युवतींना बनावट ग्राहकांनी पसंती दर्शीवली ज्या टिव्ही मालिकेत काम करीत होत्या.  प्रत्येकी ५० हजार रुपयांची मागणी केली गेली. मात्र घासाधिस नंतर ३० हजार रुपये ठरले. त्यानुसार आरोपीने या चौघींना घेऊन बनावट ग्राहकाने दिलेल्या एपीएमसीतील एका हॉटेलच्या पत्त्यावर आली . त्यावेळी आरोपीने एक लाख वीस हजार स्वीकारतात दबा धरून बसलेले पोलीस पथक समोर आले व सर्वांची रवानगी एपीएमसी पोलीस ठाण्यात झाली. 

हेही वाचा… उपकार माना, ‘एनएमएमटी’ खारघरसाठी बस सोडते! चौकी नियंत्रकाचे प्रवाशांना उत्तर

सुरवातीपासून ज्या पद्धतीने रॅकेट चालवले जात होते ते पाहता आरोपी एखादी पोक्त महिला असावी असा कयास पोलिसांचा होता मात्र प्रत्यक्ष पाहता आरोपी एखाद्या लहान युवती प्रमाणे दिसत होती. तिचे वय सतरा हे समोर आल्यावर पोलिसही चक्रावले. एखाद्या सराईत गुन्हेगारा प्रमाणे रॅकेट चालवणारी व्यक्ती अल्पवयीन निघाली याचे आश्चर्य पोलिसांनाही वाटले होते.

कायद्यानुसार आरोपी अल्पवयीन असल्याने तिची रवानगी बाल सुधारगृहात झाली तर २०-२२ वर्षाच्या त्या चार युवतींची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल आहेर यांनी दिली.