scorecardresearch

नवी मुंबई : नवीन वर्षात आरटीओचे कामकाज नवीन कार्यालयातून

नवी मुंबई शहराकरिता सन २००४ मध्ये नवी मुंबई उप प्रादेशिक कार्यालय सुरु करण्यात आले आहे. मात्र तेव्हापासून हे कार्यालय वाशीतील एपीएमसी बाजारात भाडेतत्त्वावर सुरू होते.

Navi Mumbai Vashi new RTO office
नवीन वर्षात आरटीओचे कामकाज नवीन कार्यालयातून

नवी मुंबई वाशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे नेरुळ येथील नवीन इमारतीचे काम पूर्णत्वास आले असून नवीन वर्षात आरटीओचे कामकाज नवीन कार्यालयातून सुरू होणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून रेंगाळलेल्या इमारतीवचे काम अखेर मार्गी लागले आहे. त्यामुळे नवीन वर्षात जानेवारी अखेर प्रादेशिक कार्यालय सुरू होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- महाराष्ट्र परिवहनच्या तुळजापूर ते मुंबई बसचे आरक्षण बंद; खाजगी ट्रँव्हल्सची चांदी, ऐन ख्रिसमस सुट्टीत भवानी भक्तांचा हिरमोड

नवी मुंबई शहराकरिता सन २००४ मध्ये नवी मुंबई उप प्रादेशिक कार्यालय सुरु करण्यात आले आहे. मात्र तेव्हापासून हे कार्यालय वाशीतील एपीएमसी बाजारात भाडेतत्त्वावर सुरू होते. मात्र आरटीओला आता स्वतः ची इमारत उपलब्ध होणार असून नेरूळ येथे बांधून तयार असल्याने लवकरच येथून कारभार चालणार आहे. प्रादेशिक कार्यालयाला स्वतःची जागा असावी म्हणून सिडको कडून नेरूळ सेक्टर १३ मध्ये भूखंड घेण्यात आला. मात्र सदर भूखंड ताब्यात घेण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विलंब झाला होता. अखेर सन २०१९मध्ये या उप प्रादेशिक कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन झाले. परंतु त्यांनतर करोना आणि टाळेबंदीने या इमारतीच्या बांधकामाला खो बसला होता. अखेर या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

हेही वाचा- महिन्याभरापासून नवी मुंबईला वायू प्रदूषणाच्या विळखा कायम; नेरुळ येथील हवा गुणवत्ता निर्देशांक ३५३ एक्युआय

इमारतीतील अंतर्गत सजावटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. नवीन वर्षात नव्या इमारतीत कामकाज सुरू होणार असून परिवहन कार्यालयाला सध्या दरमाह तीन लाख ६५ भाडे द्यावे लागत आहे. त्यामुळे आरटीओची आर्थिक बचत होणार आहे. नेरूळ येथील उपप्रादेशिक कार्यालयाची इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून अंतर्गत सजावटीचे काम ही अंतिम टप्प्यात आहे . त्यामुळे जानेवारीत नवीन इमारतीतुन कामकाज सुरू होईल अशी माहिती उप प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-12-2022 at 18:33 IST
ताज्या बातम्या