नवी मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्ताने १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या विशेष महासभेत घेण्यात आला, तर ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांनादेखील ८ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.
महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्ताने १४ हजार ४०० रुपये व रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांनादेखील ६३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. महासभेत आधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात ६०० रुपयांनी वाढ करत १५ हजार रुपये देण्यात आला, तर रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांसाठी १७०० रुपयांची वाढ करत ८ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.