नवी मुंबई : वाशीतील एपीएमसी कांदा बटाटा बाजारात नवीन कांदा आवक सुरू झाली आहे. मंगळवारी बाजारात कर्नाटक हुबळी येथील दोन ते अडीच टन कांदा आवक झाली. हा नवीन कांदा ओला असून प्रतिकिलो ८  ते ९ रुपये दराने उपलब्ध आहे.  मागील वर्षी गणेशोत्सवानंतर कांद्याच्या दराने उचांक गाठला होता. या वर्षी कांद्याचे दर स्थिर आहेत. आता बाजारात नवीन कांदा आवक सुरू झाल्याने कांद्याचे दर आणखी कमी होणार आहेत. पुढील किमान सहा महिने दर स्थिर राहतील असे येथील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

मंगळवारी बाजारात कर्नाटक हुबळी येथील दोन ते अडीच टन कांदा आवक झाली आहे. मात्र हा कांदा ओला आहे. त्यामुळे या कांद्याला मागणी कमी आहे. ग्राहक जुन्याच कांद्याला पसंती देत आहेत. जुना कांदा हा १४ ते १५ रुपयांवर विक्री होत आहे. तर नवीन आलेला कांदा हा प्रतिकिलो ८ ते ९ रुपये दराने उपलब्ध आहे. जानेवारीनंतर दर वाढतील बाजारात कांदा आवक चांगली आहे. त्यामुळे मागणी तसा पुरवठा होत असल्याने दर स्थरी आहेत. आता नवीन कांदा आवकही सुरू झाली आहे. त्यामुळे पुढील सहा महिने कांदा दर स्थिर राहतील. मात्र दर कमी असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लागवड कमी केली आहे.  त्यामुळे जानेवारीनंतर कांद्याचे दर वधारतील अशी माहिती व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली.

gudi padwa in Nagpur
नागपुरात गुढीपाडव्याला सुमारे १५० बालकांचा जन्म, मुलींचा टक्का अधिक
Gold price bounced in four hours on Gudi Padwa 2024
गुढी पाडव्याच्या दिवशीच चार तासात सोन्याच्या दरात उसळी; ‘हे’ आहे आजचे विक्रमी दर…
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर
Sonam Wangchuk
लेख: लडाखवासींची लोककेंद्री विकासासाठी हाक