नवी मुंबई: महापालिकेने मंगळवार २८ मे रोजी मान्सूनपूर्व कामासाठी एक दिवसाकरीता शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवला होता. त्यानंतर येत्या शुक्रवारी (ता.३१) एमआयडीसी प्रधिकरणाकडून बारवी धरणाच्या जलवाहिनीवर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे नवी मुंबईतील नागरिकांना आठवडयातून दुसर्‍यांदा पाणी बंदीला सामोरे जावे लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : नवी मुंबई : सेक्टर २६ मधील ट्रक टर्मिनल रद्द करा, माजी नगरसेवक विलास भोईर यांची सिडकोकडे मागणी

महापालिका मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर पावसाळयाच्या अनुषंगाने भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील पाणी पुरवठा २८ मे रोजी १४ तास बंद ठेवण्यात आला होता. महापालिकेच्या कामानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाणी पुुरवठा योजने अंतर्गत बारवी धरण जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. कटाई नाका ते शीळ टाकी येथे दुरुस्तीच्या कामामुळे शुक्रवार ३१ मे रोजी संपुर्ण दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नवी मुंबईतील दिघा, ऐरोली एमआयडीसी क्षेत्र त्याच प्रमाणे दिघा ते तुर्भे-नेरुळ एमआयडीसी क्षेत्र आणि औद्योगिक वसाहतीला करण्यात येणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.शनिवारी पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, असे एमआयडीसी कळविले आहे.