हरकतींवर सुनावणी १७ तारखेला, गणेश नाईक न्यायालयात जाण्यावर ठाम

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या ६ व्या निवडणुकीचे वेध सर्वानाच लागले आहेत. मागील निवडणुकीत नगरसेवकांची संख्या १११ होती. यावेळी मात्र नगरसेवक संख्या वाढून १२२ झाली आहे.वाढत्या नगरसेवकांमुळे संपूर्ण प्रभागांची रचनाही बदलली आहे. त्यामुळे १ फेब्रुवारीला प्रभागरचना जाहीर झाल्याच्या दिवसापासूनच या प्रभागरचनेवरुन राजकीय वातावरण तापले होते. तर प्रभागरचना करताना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे चुकीच्या पध्दतीने केलेल्या प्रभागरचनेवर पहिल्या १० दिवसांत फक्त १० हरकती आल्या. परंतु उर्वरीत दिवसात हरकती व सूचनांचा पाऊस पडला असून प्रभाग रचनेवर एकूण ३८५२  हरकती आल्याची माहिती पालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांनी दिली आहे.

water Mumbai, water distribution,
‘चावीवाले’ निवडणूक कामात, पाणी कोण सोडणार?
Dindori, Sharad Pawar
दिंडोरीतून मार्क्सवाद्यांच्या माघारीने शरद पवार गटाला बळ
issue of property tax of Panvel is in discussion in the Lok Sabha elections
लोकसभेच्या निवडणुकीत पनवेलच्या मालमत्ता कराचा मुद्दा चर्चेत 
independent candidate sevak waghaye using new technique of recorded voice calling for election campaign
भंडारा-गोंदिया क्षेत्राच्या उमेदवाराचा प्रचारासाठी नवा फंडा; रेकॉर्डेड व्हॉइस कॉल करून म्हणतात…

प्रभाग रचनेवरील हरकती व सूचनांवर १७ फेब्रुवारीला व त्या दिवशी सुनावणी पूर्ण न झाल्यास दुसऱ्या दिवशीही सुनावणी घेण्यात येण्याची शक्यता आहे. पालिका निवडणुकीसाठी १ फेब्रुवारीला प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. नेतेमंडळींनीही प्रभाग रचनेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. तर महाविकास आघाडीला फलदायी ठरेल अशा पध्दतीने प्रभाग रचना केल्याचाही आरोप करण्यात आला होता. मागच्या वेळी पालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना निश्चित करण्यात आली होती. त्या प्रभाग रचनेवर फक्त ५२४ हरकती घेण्यात आल्या होत्या. पालिकेच्या प्रभागरचेवरुन निवडणुकीपूर्वीच वादंगाला तोंड फुटले असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. तर काही ठिकाणी जाणीवपूर्वक प्रभाग तोडण्यात आल्याबाबत महाविकास आघाडीतील स्थानिकांमध्येही नाराजी पाहायला मिळत आहे. १४ फेब्रुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत हरकती व सूचना घेतल्यानंतर हरकती व सूचना घेतलेल्या नागरिकांना सुनावणीकरिता उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळवण्यात येणार असून हरकतीबाबतची वर्गवारी करण्यात येणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. या सुनावणीसाठी शासनाचा एक वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून त्यांच्या उपस्थितीत हरकती व सूचनांबाबत सुनावणी होणार असून त्यानंतर निवडणूक आयोग प्रभागरचना अंतिम करेल. त्यानंतर निवडणुकीबाबतची पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

पालिकेच्या इतिहासातील सहाव्या निवडणुकांसाठी १ फेब्रुवारीला पालिका मुख्यालयासह व ८ विभाग कार्यालयात व पालिकेच्या वेबसाईटवर प्रभागरचना जाहीर करण्यात आली होती.  दिघा विभागापासून ते बेलापूर विभाग या पध्दतीने करण्यात आलेल्या प्रभागरचनेत अनेकांच्या प्रभागात बदल झाले असून बहुसदस्यीय पध्दतीने निवडणुका होणार असल्याने यावेळची निवडणूक नवी मुंबई महापालिकेच्या इतिहासात सर्वार्थाने वेगळी निवडणूक होणार आहे. तीन नगरसेवकांचा मिळून एक प्रभाग व त्यांमधील लोकसंख्या व त्यांचे सीमांकन निश्चित झालेले आहे. त्यामुळे आतापर्यंत एकसदस्यीय पध्दतीने झालेल्या निवडणुकीपेक्षा वेगळे चित्र  सर्वत्रच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे एका प्रभागात ३ नगरसेवक याप्रमाणे ४० प्रभाग तर उरलेल्या २ नगरसेवकांचा १ प्रभाग अशा पध्दतीने शहरात ४१ प्रभाग जाहीर करण्यात आले आहेत.नवी मुंबईत अनेकांनी पक्षबदल केल्याने राजकीय बलाबल व प्रभारचनेमुळे अनेकांची राजकीय कोंडी होत असल्याचे चित्र आहे.नवी मुंबई महापालिकेत नगरसेवक संख्या वाढल्याने संपूर्ण राजकीय चित्र बदलणार आहे. निवडणूक बहुसदस्यीय पध्दतीने होणार असल्याने सर्वच पक्षांची कसोटी लागणार हे मात्र निश्चित आहे.

गेल्या वर्षी फक्त ५२४ तर यंदा ३८५२ हरकती सूचना

करोनापूर्वी करण्यात आलेल्या निवडणूक प्रभागरचनेवर ३५०० हजाराहून अधिक हरकती व सूचना मांडण्यात आल्या होत्या. प्रभागरचना जाहीर केल्यापासूनच चुकीच्या पध्दतीने प्रभागरचना केल्याचे सांगितले होते. शहरात ३८०० पेक्षा जास्त हरकती आल्या आहेत म्हणजेच अनेकांना प्रभागरचनेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे जास्त हरकती आल्या आहेत. वाढलेले ११ नगरसेवक हे चुकीच्या पध्दतीने वाढवलेले आहेत. २० टक्के भागात ६ नगरसेवक तर ८० टक्के भागात ५ नगरसेवक वाढवलेले आहेत.त्यामुळे चुकीच्या प्रभागरचनेबाबत न्यायालयात जाण्यावर ठाम आहे. 

गणेश नाईक, आमदार, ऐरोली

प्रभागरचना करताना निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार सर्व नियमावलींचे पालन करुन प्रभागरचना करण्यात आली आहे. प्रभागरचनेबाबत हरकती सूचना मांडण्याची मुदत संपली असून १७ तारखेला सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या उपस्थितीत सुनावणी घेण्यात येईल. त्यानंतर निवडणूक आयोगच प्रभागरचनेला अंतिम मंजूरी देईल.

अभिजीत बांगर,आयुक्त