वाशीतील एपीएमसी बाजारात गणेशोत्सवानंतर वधारलेल्या कांद्याच्या किमती दिवसेंदिवस वाढत असून मागील महिन्यात घाऊक बाजारात प्रतिकिलो ४५-५० रुपयांवर उपलब्ध असलेला कांदा आता ६० ते ६४ रुपयांवर वधारला आहे. तर किरकोळ बाजारात कांद्याने ८० रुपयांवर झेप घेतली आहे.

दिवाळीत पडलेल्या पावसाने कांद्याच्या किमतीत वाढ झाली आहे. दिवाळीनंतर बाजारामध्ये नवीन कांदा दाखविण्यास सुरुवात होते, मात्र पावसामुळे नवीन कांद्याचे उत्पादन लांबणीवर गेले आहे.   बाजारात नवीन कांदा दाखल होण्यास विलंब होणार असून डिसेंबपर्यंत दरात तेजी राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बाजारात सातत्याने कांद्याच्या दारात होणारी वाढ यामुळे ग्राहकांची कांदा जुना कांदा साठवणुकीकडे कल वाढत आहे. एपीएमसी घाऊक बाजारात १५० हून अधिक गाडय़ा आवक झाली आहे. यामध्ये ६० गाडय़ा नवीन कांदा दाखल होत असून त्यापैकी अवघा ५% नवीन कांदा चांगला निघत आहे. शेतकरीदेखील कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने परिपक्व होत नसल्याने आधीच तोडणी केली जात आहे. त्यामुळे नवीन कांदे बाजारात १५-३० रुपयांनी विकले जात असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.