scorecardresearch

किरकोळीत वाटाणा २४० रुपये किलो

भाज्यांमध्ये वाटाणा दरात मोठी वाढ झाली आहे. गुरुवारी बाजारात १६९ क्विंटल वाटाणा दाखल झाला होता.

किरकोळीत वाटाणा २४० रुपये किलो

घाऊकमध्येही आवक कमी झाल्याने दरवाढ

नवी मुंबई : सध्या जेवणातून वाटाणा हद्दपार झाल्याचे दिसत आहे. वाटाण्याचे दर प्रचंड वाढले आहेत. एपीएमसीच्या घाऊक भाजीपाला बाजारातच वाटाणा १०० ते १२० रुपये प्रतिकिलो झाला असून किरकोळ बाजारात तर तो दुपटीने म्हणजे २०० ते २४० रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे.

भाजीपाला घाऊक बाजारात भाज्यांची आवक घटली आहे, त्यात मागणी वाढल्याने भाज्यांचे दर वधारले आहेत. वाटाणा, वांगी, भेंडी, पडवळ या भाज्यांच्या घाऊक दरात ४० टक्के वाढ झाली आहे. एपीएमसी बाजारात नियमित ६०० ते ६५० गाडय़ा भाज्यांची आवक होते. गुरुवारी बाजारात ४६१ गाडय़ा आवक झाली. आवक कमी झाल्याने वाटाणा, भेंडी, वांगी, पडवळ या भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात भेंडी २४ रुपये तर वांगी ३२ रुपये प्रतिकिलो होती.

भाज्यांमध्ये वाटाणा दरात मोठी वाढ झाली आहे. गुरुवारी बाजारात १६९ क्विंटल वाटाणा दाखल झाला होता. वाटाणा पुरवठा कमी प्रमाणात झाला असून मागणी अधिक होती. अगोदरच घाऊक बाजारात वाटाणा प्रतिकिलो ९० ते १०० रुपये होता. तो गुरुवारी १०० ते १२० रुपये झाला आहे.  किरकोळीत मात्र ग्राहकांची लूट सुरू आहे. २२० ते २४० रुपये प्रतिकिलोने वाटाणा विकला जात आहे.

आवक कमी, मागणी जास्त

एपीएमसी बाजारात बुधवारी ६१९ गाडय़ांची आवक झाली होती. गुरुवारी फक्त ४६१ गाडय़ा आवक झाली. त्यात बुधवारी मुसळधार पावसाने ग्राहक कमी होते. मात्र गुरुवारी ग्राहकांची संख्या वाढली. त्यामुळे भाज्यांच्या दरात वाढ झाली.

पावसाचा परिणाम

सलग दोन दिवस पाऊस पडत असल्याने एपीएमसी बाजारात भाजीपाला आवक कमी होत आहे. हिरवा वाटाण्याचा हंगाम नसून परराज्यातील दोन ते तीन गाडी आवक होत आहे तर राज्यातून काही वाटाणा आवक होत आहे. त्यामुळे बाजारात फक्त १६९ क्विंटल वाटाणा आवक झाली.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Peas cost at rs 240 per kg in retail market zws

ताज्या बातम्या