नवी मुंबई प्रीमियर लीग अर्थात एनएमपीएल स्पर्धेच्या चौथ्या हंगामासाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया आज मुंबईमधील हॉटेल ताज पॅलेसमध्ये एका दिमाखदार सोहळ्यात पार पडली. या स्पर्धेसाठी ग्राफाईट धातूने बनवलेल्या आकर्षक अशा चषकाचे अनावरण ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार आणि या स्पर्धेचे मुख्य पुरस्कर्ते संदीप गणेश नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आले.टेनिस बॉल क्रिकेट विश्वात एनएमपीएल स्पर्धेची आतुरतेने वाट पाहिली जाते. ही स्पर्धा ६ जानेवारी ते ८ जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये नवी मुंबई कोपरखैरणे येथील भूमिपुत्र मैदानामध्ये रंगणार आहे.

हेही वाचा >>>उरण-पनवेल मार्गावरील साकव दुरुस्तीची प्रतिक्षा; सिडको आणि पीडब्लूडीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे हाल

IPL 2024 CSK Themed Wedding Invitation Card Went Viral
IPL 2024: चेन्नईच्या चाहत्यांचा नाद खुळा! CSK ची थीम अन् आयपीएलच्या तिकीटासारखी लग्नपत्रिका होतेय व्हायरल
Virat Kohli Dancing on Chiku Chants While Fielding
विराट कोहलीला चिकू हाक मारताच त्यानं फिल्डिंग सोडून केलं असं काही..चाहते झाले थक्क; पाहा Video
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
panvel dr sujay vikhe patil marathi news,
पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये

आमदार संदीप नाईक यांनी एनएमपीएल स्पर्धेने वेगळी उंची गाठल्याचे प्रसंगी नमूद केले. स्पर्धेच्या आयोजकांनी आणि त्यासाठी समर्पित भावनेने झटणाऱ्या सर्वांच्या योगदानातून आतापर्यंत या स्पर्धेचे तीन हंगाम यशस्वी झाले आहेत. खासकरून तिसरे पर्व हे आव्हानात्मक होते. करोनाचा कठीण काळ होता. आणि अशा परिस्थितीतही नकारात्मक विचारांच्या वातावरणात सकारात्मक विचार करून एनएमपीएल स्पर्धा सर्व नियम पाळून यशस्वीपणे पार पडली. त्यावेळी या स्पर्धेने सर्वांमध्ये एक वेगळा उत्साह, उमेद जागवल्याचे संदीप नाईक यांनी सांगितले. भारतामध्ये क्रिकेट हा सर्वांना जोडणारा खेळ आहे. एनएमपीएल स्पर्धेने नवी मुंबईकरांना जोडले आहे, असे मत त्यांनी मांडल. एनएमपीएल प्रत्यक्ष स्पर्धेमध्ये अनेक सरप्राईजेस असून या स्पर्धेचा बक्षीस समारंभ देखील आगळावेगळा होणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणारे एनएमपीएल कमिटीचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचा संदीप नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर संघ मालकांचा देखील गौरव करण्यात आला.आयपीएल प्रमाणेच खेळाडू लिलाव पार पडला.लिलाव प्रक्रियेचे सूत्रसंचालन नावाजलेले समालोचक कुणाल दाते यांनी केले. नगरसेवक लीलाधर नाईक यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.

हेही वाचा >>>महिला ब्रश घेऊन बाहेर पडली अन् थोडक्यात वाचला जीव, स्वयंपाकघरातून बाहेर पडताच छत कोसळले

नवी मुंबई रत्नांचा सन्मान..
आपल्या कर्तबगारिने नवी मुंबई शहराचा सन्मान देश-विदेशात वाढविणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान एनएमपीएल लिलाव प्रक्रिया कार्यक्रमातसंदीप नाईक यांच्या शुभहस्ते नवी मुंबई रत्न पुरस्कार देऊन करण्यात आला. यामध्ये फोर्टी प्लस क्रिकेट फॉरमॅटची जगाला ओळख करून देणारे मास्टर प्रदीप पाटील, आगरी-कोळी बांधवांची संस्कृती संपूर्ण विश्वात कलेच्या माध्यमातून वाढविणारे कलाकार नंदकुमार म्हात्रे, आयपीएल मधील रॉयल चॅलेंज बंगळुरू संघाचे फिजिओथेरपिस्ट रमेश माने, खोखो आणि कबड्डीपटू रमेश यादव आणि शक्ती सिंग या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.नवी मुंबई प्रीमियर लीगचे स्वप्न सत्यामध्ये आणणारे या स्पर्धेचे आधारस्तंभ या स्पर्धेला बळ देणारे संदीप नाईक यांना बाहुबली पुरस्कार देऊन एनएमपीएल समितीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

हेही वाचा >>>नवी मुंबई विमानतळ परिसरातील सुरुंग स्फोटामुळे वहाळमधील घरांना तडे

एनएमपीएलमध्ये सहभागी संघ पुढीलप्रमाणे…
कुकशेत अवेंजर्स, पार्थ रॉयल बोनकोडे, वाशी इंडियन्स, परी इलेव्हन, वन सोल्युशन करावे ,वरद लॉजिस्टिक, साईप्रसाद गोठवली, अथर्व चॅलेंजर्स सानपाडा ,शिरवणे प्रतिष्ठान, इच्छापूर्ती वाशी गाव ,टोनी टायटन्स, जय मल्हार फायटर्स, एमपी वॉरियर्स कोपरखैरणे, टायटन नवी मुंबई, डी. आर. पाटील वॉरियर्स, किरण इलेव्हन शिरवणे.

६२४ खेळाडूंचा लिलाव ..
एनएमपीएल स्पर्धेसाठी एकूण ६२४ खेळाडूंचा लिलाव पार पडला. यापैकी २४० खेळाडूंवर बोली लावून संघमालकांनी त्यांना आपल्या संघासाठी निवडले. स्पर्धेमध्ये सोळा संघ अजिंक्यपदासाठी लढणार आहेत. लिलावामध्ये सात खेळाडूंना सर्वोच्च १२ हजार रुपयांची बोली लागली. हे सर्व नावाजलेले खेळाडू आहेत. भूषण पाटील पार्थ रॉयल बोनकोडेसाठी खेळणार आहेत. विकी भोईर एमपी वॉरिअरसाठी, धीरज भोईर टोनी टायटनसाठी, रवी म्हात्रे डी. आर. पाटील वॉरियर्सकरता मैदानात उतरणार आहेत. भावेश नाईक करण इलेव्हनसाठी, ओमी केणी शिरवणे संघासाठी तर गौरव बडदे परी इलेव्हन संघाच्या विजयासाठी आपली ताकद लावणार आहेत.

एकमेवद्वितीय आकर्षक-कलात्मक स्पर्धाचषक…
एनएमपीएल स्पर्धा विजेत्यांसाठी घडविलेला यंदाचा स्पर्धा चषक हा भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारचा चषक असून तो ग्राफाईट धातूने तयार केलेला अत्यंत कमी वजनाचा आहे.