यंदा कमी पावसामुळे पाण्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई शहरात पाणी पुरवठय़ात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे शहरात होत असलेल्या नवीन बांधकामांना आणि उद्यानांसाठी पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन नवी मुंबई पालिका क्षेत्रातील तलावांमध्ये असलेले पाणी नवीन बांधकामांना आणि उद्योगांना वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तलावांची साफसफाई करण्यात येत आहे. यामुळे पालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की, नवी बांधकामांना आवश्यक असलेले पाणी बेलापूर गाव, आग्रोळी, दारावे, कराळे, नेरुळगाव, शिरवणे, चिंचवली तलाव, कोपरीगाव, जुहूनगर, खोपड तलाव, तुर्भे एमआयडीसी, बोनकोडे, घणसोली, रबाळे, गोठिवलीतील खदाणी तलाव, ऐरोली नाका, दिवागाव आणि दिघा येथील तलावांमधून भरणेस नवी मुंबई पालिकेकडून अनुमती दिली आहे. तरी नगारिकांनी तलावांतील पाण्याचा आवश्यकतेनुसार वापर करावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त शहर अभियंता अंकुश चव्हाण यांनी केले.