नवी मुंबईत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत दुभाजक पदपथला रंगरंगोटीचे काम सुरु आहे. मात्र, अनेक ठिकाणी कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच रंग देण्यापूर्वी पदपथ वा दुभाजकाची डागडुजी गरजेची असताना त्याकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा- सीवूड्समधील टिळक एज्युकेशन शाळेच्या इमारतीत अनधिकृत बांधकाम; नवी मुंबई महापालिकेने बजावली नोटीस

स्वच्छ भारत अभियानात नवी मुंबईने अनेकदा बाजी मारली आहे. हे स्तुत्य असले तरी गेल्या काही महिन्यापासून  स्वच्छ भारत अभियानात होणारा खर्च आणि जागोजागी लावण्यात आलेले खर्चिक फ्लेमिंगो सुद्धा हा चर्चेचा विषय बनला आहे. याच अभियानांतर्गत दर्शनी भागातील भिंतीवर आकर्षक व सूचक चित्रे काढण्यात आली होती. तर सध्या रस्त्यातील दुभाजक व पदपथला रंग देण्याचे काम सुरु आहे. मात्र अनेक ठिकाणी हे काम केली जात नाहीत तर उरकली जातात असे दृश्य दिसत आहे. रंग देण्यापूर्वी दिला जणारा प्रायमर रंगच अत्यंत दर्जाहीन पद्धतीने दिला जात असल्याने त्यावरील रंग कितीही उच्च दर्जाचा व चांगला दिला तरी टिकत नाही. अशी माहिती एका अधिकार्याने दिली. मात्र या कडे समंधीत अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याचे प्रत्यक्ष काम पाहुल लक्षात येते अशी जोडही त्यांनी दिली.

हेही वाचा- नवी मुंबई : नववर्षात सायन पनवेल महामार्ग एलईडीच्या दिव्यांनी उजळणार; महामार्गावरील ६२८ बंद दिव्यांचीही दुरुस्ती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाशीतील छ. शिवाजी महाराज चौक म्हणजे शहरातील अत्यंत महत्वाचे ठिकाण मानले जाते. कुठलेही आंदोलन असो निदर्शने असो  वा राजकीय विजयाचा जल्लोष असो याच ठिकाणी करण्यात येतो.शिवाय विष्णुदास भावे नाट्यगृह असल्याने आसपाचे अनेक नाट्यप्रेमी तसेच नाट्यकार्मिंची ये जा येथून होत असते. मात्र अशा ठिकाणीही काम करताना दुर्लक्ष केले जात आहे. अत्यंत पातळ प्रायमर दिल्याने त्यावर दिला जाणारा रंग टिकावू राहत नाही शिवाय छोटा मोठा अपघात वा अन्य कारणांनी झालेली तुटफुटकडे दुर्लक्ष करून रंग दिले जात आहेत. अशी माहिती छ शिवाजी महाराज चौकात बसण्याची सोय केलेल्या कट्ट्यावर नियमित येणारे जेष्ठ नागरिक  नारायण पाटील यांनी दिली. तसेच याबाबत माहिती घेऊन योग्य त्या सूचना केल्या जातील. आणि यापुढे काळजी घेतली जाईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता अजय संख्ये यांनी दिली.