मागील काही महिन्यांपासुन कांदा पाठोपाठ बटाट्याचे दर देखील वरचढ ठरत आहेत. बाजारात आता नवीन बटाटा देखील दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.मात्र यंदा सुरुवातिला पाऊस लांबल्याने नवीन बटाटा बाजारात दाखल होण्यास विलंब झाला आहे. परंतु आता बाजारात नवीन बटाटा आवक वाढली असून जुना बटाटा हंगाम कमी होत आहे. येत्या १० ते १५ दिवसांत जुन्या बटाट्याचा हंगाम संपुष्टात येणार आहे. परंतु सध्या बाजारात जुन्या बटाट्याचा हंगामी संपत आलेला असतानाही , नवीन बटाट्यापेक्षा जुने बटाट्याचे दर अधिक भाव खात आहेत. एपीएमसीत नवीन बटाटा प्रतिकिलो ८ ते १२ रुपये तर जुना बटाटा १८ ते २१ रुपयांनी विक्री होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- मोदींच्या सभेसाठी नवी मुंबईतून १४२ गाड्यांचा ताफा रवाना

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rates of old potato higher in apmc market navi mumbai dpj
First published on: 19-01-2023 at 18:02 IST