आठवडय़ात दोन वेळा शिवसेना-भाजपकडून स्वतंत्र कार्यक्रम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई</strong> : ऐरोली येथील नाटय़गृहाच्या भूमिपूजनावरून  व श्रेयवादावरून शिवसेना व भाजप यांच्यात वाद सुरू झाला आहे. आठवडाभरात एकाच नाटय़गृहाचे प्रथम ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी गेल्या रविवारी (ता.३१) नागरिकांच्या हस्ते नारळ वाढवून भूमिपूजन केले तर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ िशदे यांच्या हस्ते शनिवारी (दि.४ रोजी) भूमिपूजन करण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी आरोपांच्या फैरी झाडल्या असताना अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प प्रत्यक्षात कधी येणार याकडे लक्ष लागले आहे.

नवी मुंबई महापालिकेचे विष्णुदास भावे हे एकमेव नाटय़गृह आहे.  शहरात आणखी एक नाटय़गृह व्हावे यासाठी तत्कालीन आमदार, नगरसेवकांनी प्रयत्न केले. परंतु त्यावेळी राष्ट्रवादीत असलेल्या गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केले. तर स्थानिक नगरसेवक एम.के.मढवी हे  शिवसेनेत गेले. २०१४  पासून येथील नाटय़गृहाचे काम रखडले आहे. सुरुवातीला आमदार संदीप नाईक यांनी भूमिपूजन  केले होते. त्यानंतर विविध कारणांनी हे काम रखडले होते. या कामाचा खर्च वाढून ७० कोटींवर गेलेला आहे.  या कामाचे श्रेय मढवी यांना मिळू नये यासाठी नाईकांचा प्रयत्न आहे. त्यांनीच या नाटय़गृहाचे काम बंद केले होते असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला. तत्कालीन आमदार संदीप नाईक यांनीच त्यांच्याकाळात नाटय़गृहासाठी भूखंड मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले व ३० लाखांचा निधी दिला तर आता आपल्या निधीतून २५ लाखांचा निधी देण्यात येणार आहे असे गणेश नाईक यांनी सांगितले.

ऐरोलीत नाटय़गृह व्हावे व त्यासाठी भूखंड मिळवण्यापासून कोणी प्रयत्न केलेत हे नागरिकांना माहीत आहे. नाटय़परिषदेच्या सूचनेनुसार ८०० आसनक्षमता करण्यात येत आहे. सरकारी कागदोपत्री सर्वच ठिकाणी कोणी पाठपुरावा केला हे सत्य समोर आहे. नवी मुंबईत सध्या  ठाण्याचे अतिक्रमण सुरू आहे. परंतु जनतेला सर्व माहिती आहे.

 संदीप नाईक, माजी आमदार, ऐरोली

ऐरोली हॉस्पिटलची पाहणी करायला गेले आणी नाटय़गृहाचे भूमिपूजन करण्याचा प्रयत्न केला तो पूर्णत: बेकायदेशीर आहे. सकाळी भूमिपूजन आणि त्या ठिकाणी संध्याकाळी भूमिपूजनाचा फलक लावला असून नाटय़गृहाचे काम रखडण्यास  २२ कोटींचा खर्च वाढण्यास नाईकच जबाबदार आहेत.

     एम.के.मढवी, माजी नगरसेवक, शिवसेना 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena bjp dispute over lay foundation of auditorium in airoli zws
First published on: 06-09-2021 at 03:38 IST