ऐरोली सेक्टर २० ए मध्ये राहणाऱ्या हिमांशू अहिरे या सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. आत्महत्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस त्याचा तपास करीत आहेत.
ऐरोली येथील सेंट झेवियर्स शाळेत हिमांशू इयत्ता सातवीत शिकत होता. त्याने शुक्रवारी (दि. २७) रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आठच्या सुमारास त्याची मोठी बहीण बाहेरून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तपासात हिमांशू याची एक चिठ्ठी सापडली त्यावर ‘गुड बाय’ असे लिहिलेले आहे. त्याचे आई-वडील वेगळे राहत आहेत.