scorecardresearch

नवी मुंबई : एपीएमसी सभापतीची निवड लांबणीवर; संचालक मंडळाची बैठक पुढे ढकलली

सभापतीची निवड लांबली असून बाजार समितीवर प्रशासकीय राजवट शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

नवी मुंबई : एपीएमसी सभापतीची निवड लांबणीवर; संचालक मंडळाची बैठक पुढे ढकलली
एपीएमसी सभापतीची निवड लांबणीवर (संग्रहित छायाचित्र)

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीते सभापती अशोक डक यांनी डिसेंबर अखेरीस सभापती पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची बैठक उद्या गुरुवारी होणार होती. या बैठकीत सभापती आणि उपसभापती यांची निवड केली जाणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र सदर बैठक पुढे ढकलण्यात आली आहे ,अशी माहिती बाजार समितीचे उप सचिव प्रकाश अष्टेकर यांनी दिली आहे.

हेही वाचा- नवी मुंबईच्या सुशोभिकरणाला नवी झळाळी; भित्तीचित्रे, शिल्पाकृतींची होतेय डागडुजी

ही बैठक रद्द झाल्याने सभापतीची निवडणूक लांबली आहे. तर दुसरीकडे बाजार समितीतील ७ अपात्र संचालकांची सुनावणी पणन मंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर झाली आहे. त्याचा निर्णय राखून ठेवला आहे. आजची बैठक पुढे ढकलल्याने सभापतीची निवड लांबली असून बाजार समितीवर प्रशासकीय राजवट शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-01-2023 at 18:54 IST

संबंधित बातम्या