पनवेल: १० वर्षांपासून पनवेलकरांची सांस्कृतिक भूक भागविणा-या पनवेल शहरातील आद्यक्रांतीवीर वासूदेव बळवंत फडके नाट्यगृहाचे अंतर्गत दुरुस्तीचे काम पनवेल पालिकेने हाती घेतले असून त्यासाठी ५५ लाख रुपये खर्च पालिका प्रशासन कऱणार आहे. हे काम करता यावे म्हणून नाट्यगृह व्यवस्थापनाने मार्च व एप्रिल महिना या दरम्यानच्या नाटक व कार्यक्रमांच्या आगाऊ बुकींग घेतलेल्या नाहीत. परंतू निवडणूक आयोगाकडून कधीही आचारसंहिता लागू होऊ शकते यामुळे नेमके हे नाट्यगृह कधीपासून व कधीपर्यंत बंद राहील हे पालिकेने जाहीर केले नसल्याने पुढील ६० दिवस पनवेलकरांना नाटकाविना रहावे लागणार आहे. आद्यक्रांतीवीर वासूदेव बळवंत फडके नाट्यगृहाची आसन क्षमता ६५० आहे. नाट्यगृहातील रंगमंचाच्या खालील लाकडी साचा निकळण्याच्या तक्रारी नाट्य कलावंतांकडून झाल्या होत्या. तसेच रंगमंचाजवळील पडद्याची व्यवस्था, विंग, विज  व्यवस्थेच्या तक्रारी होत्या. काही खुर्च्या नादुरुस्त असून त्या बदलण्याची मागणी प्रेक्षकांकडून केली जात होती. कार्पेट बदलणे अशा इतर कामांसाठी ५५ लाख रूपयांचा खर्च पालिका प्रशासन करणार आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यातील ६० दिवस फडके नाट्यगृह कामासाठी बंद ठेवून ही कामे तातडीने करुन घ्यावीत असे पालिकेचे नियोजन असल्याची माहिती नाट्यगृहाचे व्यवस्थापक राजेश डोंगरे यांनी सांगीतले. 

या नाट्यगृहाचा सर्वाधिक वापर नाटकांपेक्षा पालिकेच्या सर्वसाधारण सभागृहासाठी झाला. तसेच केंद्र व राज्य सरकारचे विविध प्रशिक्षणाचे कार्यक्रम याच नाट्यगृहात झाली. निवडणूक आयोगाने यापूर्वी याच नाट्यगृहाचा सरकारी कर्मचारी व अधिका-यांच्या मार्गदर्शनासाठी वापर केला असल्याने हे नाट्यगृह आचारसंहितेवेळी पालिकेला निवडणूक आयोगाने मागीतल्यास काय करावे असा प्रश्न पालिकेला पडला आहे. पालिकेने मार्च ते एप्रिल या दोन महिन्यात नाटकांची बुकींग घेतली नसली तरी शुक्रवारपासून नाट्यगृहाचे काम सूरु करावे की नाही याबाबत अद्याप पालिकेत साशंकता आहे.

Pimpri road, road development works,
पिंपरी : रस्ते विकासाच्या ९० कोटींच्या कामात ‘रिंग’?
mumbai pune share 51 percent of total sales in housing market
घरांच्या बाजारपेठेत मुंबई, पुण्याचा ५१ टक्के वाटा; तिमाहीत सात महानगरांत १.३० लाख घरांची विक्री
scam in milk supply
दूध आणि पोषण आहार पुरवठ्यात कोट्यवधींचा घोटाळा; आमदार रोहित पवार यांचा आरोप
Why is the demand for office spaces increasing in Pune
पुण्यात कार्यालयीन जागांना का वाढतेय मागणी? जाणून घ्या कारणे…