लोकसत्ता प्रतिनिधी

पनवेल: पश्चिम संस्कृतीचा विचार जगाला बाजार समजतो. मात्र भारतीय संस्कृतीचा विचार जगाला परिवार समजतो. हाच विचार दासबोधाच्या निरुपणातून आप्पास्वारींनी श्री सदस्यांच्या मनात संस्काराचे रोपन केल्याने नवी पीढी घडत असल्याने श्री सदस्यांपेक्षा श्रीमंत माणूस सध्या कोणीही नसल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खारघर येथे केले.

खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार महासोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षात हा पुरस्कार सोहळा वितरीत झाला. श्री सदस्यांची शिस्त व श्रद्धा पाहून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे कौतुक करताना श्री सदस्य हे जगातले आठवे आश्चर्य असून पैशांच्या श्रीमंतीपेक्षा आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून मिळालेल्या विचाराची श्रीमंती घेऊन प्रत्येक श्री सदस्य जगतो याकडे लक्ष वेधले.

आणखी वाचा-नवी मुंबई: कार्यक्रम मोठा देखणा, उत्तम व्यवस्था; मात्र मुखपट्टीला सुट्टी

आप्पासाहेबांनी केलेल्या निरुपणाच्या माध्यमातून श्री सदस्यांमध्ये सकारात्मकता आली. कपडे, अंग ही धुता येतात. आप्पासाहेबांच्या शब्दांमुळे निरुपनातून गरीबांनाही त्यांची मन स्वच्छ करुन जगता आले याकडे उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणने गेल्या अनेक वर्षातील केलेल्या विविध कामांची माहितीचा तक्ता या पुरस्कार सोहळ्यावेळी वाचन केला.

चांडेल्य ते धर्माधिकारी

धर्माधिकारी घराण्याचा आठ पिढ्यांचा इतिहास हा 450 वर्षाचा आहे. गोविंद चिंतामन चांडेल्य हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात धर्म जागृतीचे काम करत होते. आरमारीचे प्रमुख कानोजी आंग्रे चांडील्य यांना धर्माधिकारी असे आडनाव मिळाल्याचा दाखला इतिहासात असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.