ऐरोलीमधील शिवानंद चॅरिटेबल ट्रस्ट श्री सिद्धिविनायक मंडळ यांच्यातर्फे ऐरोली सेक्टर ५ येथील सरस्वती मैदानात गुरुवारी भक्तिसंगम कार्तिकस्नान व तुळशी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवारी सकाळी ९ ते १२ चतुश्लोकी भागवत सायंकाळी प्रवचन व ७ वाजता तुळशी उत्पत्ती तर शुक्रवारी सकाळी ९ ते १२ चतुश्लोकी पारायण, सायकांळी तुळशीमाहात्म्य व तुळशी कवच कथा , २१ नोव्हेबर रोजी सकाळी ९ ते १२ आपंद भुवन व गोधळ भराड यांचा कार्यक्रम होणार असून सायंकाळी तुळशी वास्तुदोष, तुळशी स्तुती हरिपाठ होणार आहे.
२२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १२ रुक्मिणी स्वयंवर पारायण होणार असून दुपारी ४ ते ७ वाजता दिंडी सोहळा होणार आहे. सायंकाळी तुळशी व ग्रहदोष यावर पारायण होणार आहे. २४ नोव्हेंबर रोजी पंचकुष्टीय महायज्ञ सायंकाळी मोफत सामुदायिक विवाह सोहळा, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते ११ डॉ. विजय बाळसराफ यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Nov 2015 रोजी प्रकाशित
ऐरोलीमध्ये भक्तिसंगम कार्तिकस्नान
२५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते ११ डॉ. विजय बाळसराफ यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
Written by मंदार गुरव
Updated:

First published on: 18-11-2015 at 01:09 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tulsi marriage celebration in airoli