राज्यात सर्वत्रच पाण्याचा तुटवडा असल्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून आठवडय़ातील दोन दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घोषित केला आहे. आठवडय़ाच्या दर बुधवारी रात्री १२ वाजल्यापासून शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत ४८ तास नवी मुंबईचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नवी मुंबई पालिका क्षेत्रातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून मुळे गावठाणे, झोपडपट्टी, दिघा विभाग, ऐरोली या परिसरात पाणीपुरवठा बंद राहील. या भागामध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल. पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन पालिका व एमआयडीसीकडून करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Nov 2015 रोजी प्रकाशित
नवी मुंबईत दोन दिवस पाणीपुरवठा बंद
असे आवाहन पालिका व एमआयडीसीकडून करण्यात आले आहे.
Written by मंदार गुरव
Updated:
First published on: 19-11-2015 at 00:02 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two days off the water supply in navi mumbai