नवी मुंबईतील कोपरखैरणे नोड येथे एका मैदानात युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. आज सकाळी प्रभात फेरीसाठी आलेल्या काही जणांनी मृतदेह पाहताच या बाबत पोलिसांना माहिती दिली. कोपरखैरणे सेक्टर २३ येथील भूमिपुत्र मैदानात एका युवकाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या कडील कागदपत्रांवरून त्याची ओळख पटली असून साहिल शांताराम गोळे (वय १७) असे त्याचे नाव आहे.

हा युवक कोपरखैरणे सेक्टर १५ येथे राहणारा असून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात १२ वी इयत्तेमध्ये तो शिकत होता. त्याची डोक्यात दगड घालून हत्या केल्याचे निदर्शनास आले आहे. या परिसरात सकाळी मोठ्या प्रमाणात प्रभात फेरीसाठी लोक येत असतात. त्यातील काही जणांनी हा मृतदेह पाहताच पोलिसांना माहिती दिली. सदर मृतदेह ताब्यात घेत वैद्यकीय तपासणीसाठी प्रथम संदर्भ रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. ही हत्या कुणी आणि कशासाठी केली या बाबत तपास सुरू आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तीदार यांनी दिली.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’
MBBS student medical Nagpur
नागपूर : ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडले !
Nursing student commits suicide in hostel
नागपूर : धक्कादायक! नर्सिंगच्या विद्यार्थिनीची वसतिगृहातच आत्महत्या