News Flash

चार्ल्स विल्किन्स (१)

जुजबी शिक्षण झाल्यावर चार्ल्स ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत आणि लंडनच्या एका मुद्रकाकडे नोकरीस लागले.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीतील नोकरीच्या निमित्ताने भारतात आलेल्या अनेक युरोपियन लोकांनी आपले काम करीत असताना वेगवेगळे छंद जोपासले, अनेक क्षेत्रांमध्ये विशेष काम करून भारतीय संस्कृती अधिक समृद्ध केली. त्यापकी चार्ल्स विल्किन्स हे एक ब्रिटिश मुद्रणतज्ज्ञ. यांचा जन्म १७४९ सालचा. इंग्लंडमधील सॉमरसेट परगण्यातला. बंगाली लिपीचा टाइप (खिळे) त्यांनी कर्मकार पंचानन या बंगाली माणसाच्या साहाय्याने प्रथम तयार केला हे त्यांचे कर्तब. बंगाली लिपीच्या टाइपने त्यांनी प्रथमच बंगाली पुस्तके छापली म्हणून त्यांना ‘कॅगस्टन ऑफ इंडिया’ असे आदराने संबोधले जाते!

जुजबी शिक्षण झाल्यावर चार्ल्स ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत आणि लंडनच्या एका मुद्रकाकडे नोकरीस लागले. १७७० मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने त्यांना कलकत्त्यात पाठवलं ते एक मुद्रणतज्ज्ञ आणि लेखक म्हणून. पíशयन भाषेचे ते जाणकार होतेच, पण कलकत्त्यात आल्यावर, अल्पकाळातच ते बंगालीही सराईतपणे बोलू लागले. पुढे चार्ल्सची ओळख कर्मकार पंचानन या कारागिराशी झाली आणि त्याच्या मदतीने त्यांनी छपाईसाठी लागणारे बंगाली लिपीतले टाइप प्रथमच तयार केले. या टाइपच्या साहाय्याने चार्ल्स यांनी बंगाली भाषेत आणि बंगाली लिपीत छापलेले पुस्तक हे अशा प्रकारचे पहिले पुस्तक होय! त्यापाठोपाठ त्यांनी पíशयन लिपीचे टाइपही बनवले आणि त्यावरून पíशयन पुस्तकेही छापली. चार्ल्सची बंगाली आणि पíशयन भाषांमधील गती पाहून कंपनी सरकारने त्यांना महसूल आयुक्तांसाठी आणि कंपनीच्या प्रेससाठी बंगाली आणि पíशयन भाषांचे अनुवादक म्हणून नियुक्ती केली.

१७८४ मध्ये चार्ल्सनी विल्यम जोन्स यांना एशियाटिक सोसायटी स्थापन करण्यात मोठी मदत केली, त्यामुळे १७८८ मध्ये त्यांना रॉयल सोसायटीचे निर्वाचित सदस्य जाहीर केले गेले. याच दरम्यान त्यांनी कुटिला या लिपीतला शिलालेख अनुवादित केला. या काळात चार्ल्स विल्किन्स यांनी इंग्रजीमधले शास्त्रीय आणि धार्मिक ग्रंथांचे अनुवाद करून ते मुद्रितही केले. चार्ल्स भारतात आले ते अधिकतर बंगालमध्ये राहिले. येथील आपल्या सोळा वर्षांच्या वास्तव्यात त्यांचे बंगाली साहित्य क्षेत्रातील योगदान मोठे आहे.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2018 12:05 am

Web Title: charles wilkins
Next Stories
1 शेवटचं निष्क्रिय मूलद्रव्य
2 जे आले ते रमले.. : एडवर्ड बेलफोर यांचे कार्य (२)
3 कुतूहल : न पाहिलेल्या मूलद्रव्याचा शोध
Just Now!
X