News Flash

कापडातील ताणा-बाणा

कापड विणताना धाग्यांचे दोन संच वापरले जातात. ते दोन्ही संच एकमेकांशी ९० अंशाचा कोन करून विणले जातात. म्हणजेच ते एकमेकांत गुंतवले जातात.

| July 23, 2015 12:20 pm

कापड विणताना धाग्यांचे दोन संच वापरले जातात. ते दोन्ही संच एकमेकांशी ९० अंशाचा कोन करून विणले जातात. म्हणजेच ते एकमेकांत गुंतवले जातात. या पद्धतीने निर्माण केलेले कापडच मोठय़ा प्रमाणात वापरले जाते. त्यामुळे या दोन संचांचा परिचय करून घेणे गरजेचे आहे.
हे दोन संच ताणा आणि बाणा या नावाने ओळखले जातात. कापडाच्या किनारीला समांतर जे धागे असतात त्यांना ताणा म्हणून ओळखले जाते. कापड विणताना या संचावर ताण दिलेला असतो. हा ताण सहन करण्यासाठी दुहेरी किंवा बहुपदरी धागे वापरले जातात. याचा उपयोग सतरंज्या, चादरी, टॉवेल इत्यादी वस्त्रप्रकार उत्पादन करताना केला जातो. पण जेव्हा हा एकच धागा ताणा म्हणून वापरला जातो, तेव्हा विणण्यापूर्वी कांजी करण्याची प्रक्रिया केली जाते. म्हणजे कापड विणताना दिला जाणारा ताण हे धागे सहन करू शकतील. याच दिशेने कापडाची लांबी मोजतात आणि आपण कापड खरेदी करताना जो दर देतो तो पण प्रतिमीटर (लांबी) यानुसारच देतो.
ताण्याला काटकोनामध्ये जो दुसरा धाग्याचा संच कापड विणताना गुंतवला जातो त्याला ‘बाणा’ म्हणून ओळखले जाते. ताण्यासारखी कांजी करणे किंवा दुहेरी, बहुपदरी धागे वापरणे हे बाण्यासाठी अनिवार्य नाही. सतरंज्या, चादरी विणताना दुहेरी, बहुपदरी बाणा वापरला जातो. शिवाय टू बाय टू या प्रकारच्या कापडातही असेच ताण्यासाठी आणि बाण्यासाठी दुहेरी धागे वापरले जातात. अन्यथा इतर बऱ्याच कापड प्रकारात – शìटग, ड्रेसमटेरियल, साडय़ा यांच्या निर्मितीसाठी ताणा आणि बाणा हा एकच धाग्याचा वापर केला जातो. त्या वेळी ताण्याला कांजी केलेली असते. बाण्याच्या बाबतीत ताण्याएवढा ताण पडत नसल्यामुळे एकेरी धागा असला तरी
कांजी करावी लागत नाही. बऱ्याच कापड प्रकारात ताण्याचा सूतांक हा बाण्याच्या सूतांकापेक्षा कमी असतो. काही वेळाच तो एकसारखा असतो. सूतांक म्हणजे धाग्याचा तलमपणा दर्शवणारा अंक. सूतांक ठरवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर केला जातो.
दिलीप हेर्लेकर (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

संस्थान लिंबडी
गुजरातच्या वायव्येस, काठेवाडातील सध्याच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यात वसलेले लिंबडी हे शहर ब्रिटिशराजमध्ये एक महत्त्वाचे संस्थान होते. ‘झाला राजपूत’ घराण्याचा वंशज सांगोजी या तत्कालीन गोध्रा राज्यातील एका योद्धय़ाने मेंढपाळांच्या मदतीने वाघेलांवर हल्ला करून त्यांना पराभूत केले. या त्याच्या कामगिरीवर खूश होऊन सुलतानाने सांगोजीला काही गावे इनाम दिली. पुढे त्याने छोटे सन्य बाळगून आपले छोटे राज्य स्थापन केले आणि लिंबडी या गावी राज्याची राजधानी केली.
१७६८ साली स्थापन झालेले िलबडी राज्य १८०७ साली तत्कालीन राजा श्री हरिसिंहजी याने ईस्ट इंडिया कंपनीशी संरक्षणाचा करार केल्यावर सन १९४८ पर्यंत एक संस्थान बनून राहिले. १७६८ ते १९४८ या काळातील लिंबडी शासकांपकी जसवंतसिंहजी आणि जटाशंकर ऊर्फ दौलतसिंह यांच्या कारकीर्दीत लिंबडी संस्थान वैभवसंपन्न बनले. लिंबडीचे राज्यक्षेत्र ९०० चौ.कि.मी. होते. १९२१ साली राज्याची लोकसंख्या ६० हजार होती आणि उत्तम प्रशासनामुळे राज्याला नऊ तोफ सलामींचा मान प्राप्त झाला. प्रत्येक िलबडी शासकाने आपापल्या परीने व्यापार उद्योगाला चालना देऊन, शिक्षण क्षेत्रासारख्या सामाजिक सुधारणा करून आणि चोख प्रशासन देऊन वैभवसंपन्न राज्यांमध्ये लिंबडी संस्थानाची गणना करून ठेवली.
लिंबडीचा शेवटचा अधिकृत राजा छत्रशैल्यसिंह १९४१ साली गादीवर आला, तेव्हा अल्पवयीन असल्याने ब्रिटिश सरकारने रीजंट नियुक्त केला. हा राजा सहा वर्षांचा असताना १९४७ साली लिंबडी संस्थान स्वतंत्र भारतात सामील केले गेले. पुढे हा नामधारी राजा भारतामधला एक यशस्वी हॉटेल उद्योजक म्हणून विख्यात झाला.

सुनित पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2015 12:20 pm

Web Title: curiosity
Next Stories
1 कुतूहल – विणण्याची पूर्वतयारी- कांडी भरण्याची यंत्रे
2 कुतूहल – विणण्याची पूर्वतयारी- बाण्यासाठी
3 जुनागढ राज्य स्थापना
Just Now!
X