कोंबडय़ांसाठी मोठी घरे बांधताना पुढील बाबतीत काळजी घ्यावी.
घरांची रुंदी: कोंबडय़ांच्या उघडय़ा बाजूंच्या घरांची रुंदी साधारणपणे २० ते ३० फूट असावी. यापेक्षाही म्हणजे, ४० फूट रुंद घरेही बांधण्यात येतात. परंतु रुंदी त्यापेक्षा अधिक असल्यास उष्ण हवामानात हवेचा भरपूर पुरवठा होत नाही. उष्णता वाढते व पक्ष्यांवर विपरीत परिणाम होतो.
घरांची उंची: घराच्या दोन्ही बाजूंची उंची साधारणपणे सहा ते आठ फूट असते. हवामान अधिक उष्ण असल्यास उंची ८ फुटांपर्यंत वाढवावी.
 घरांची लांबी: घरांची लांबी कोंबडय़ांच्या एकूण संख्येवर अवलंबून असते. स्वयंचलित यंत्राद्वारे खाद्यपुरवठा करायचा असल्यास ही बाब महत्त्वाची असते.     
छपराचा आकार : बहुतेक पक्ष्यांच्या घराला मध्यभागातून दोन्हीकडे उतरते छप्पर बसवतात. त्यांचा उतार एकचतुर्थाश ते एकतृतीयांश असावा. छपराच्या बाजूचा भाग िभतीच्या शक्यतो अधिक बाहेर यावा, जेणेकरून पाऊस आत येणार नाही व सावलीही राहील.
उष्णतारोधक व्यवस्था: घरांच्या छपरातून उष्णता आत किंवा बाहेर जाऊ नये, म्हणून उष्णतारोधक व्यवस्था करावी.
घराचा पाया: घराचा पाया पक्का म्हणजे मजबूत असावा. सिमेंट काँक्रिटचा पाया उत्तम असतो.
जमीन : घरातील जमीन सिमेंट काँक्रीट किंवा त्यासारखी पक्की असल्यास ओल येत नाही. रोगास प्रतिबंध होतो.
घराचे दरवाजे: घराचे दरवाजे रुंद व उंच असावेत, जेणेकरून साहित्य ने-आण करण्यात अडचण येणार नाही. साधारणत: अडीच बाय सात फूट दारे असावीत. लोखंडी दारे र्निजतुकीकरणासाठी सोपी आहेत.
घराच्या बाजू : घराच्या दोन्ही बाजू बऱ्याच प्रमाणात उघडय़ा ठेवाव्यात. साधारणपणे उन्हाळा व हिवाळा सारखाच तीव्र असल्यास वरील अर्धी बाजू उघडी ठेवावी. उन्हाळा तीव्र असल्यास यापेक्षा अधिक बाजू उघडी ठेवावी. उघडय़ा ठिकाणी तारेची बारीक जाळी बसवावी. कोंबडय़ा िपजऱ्यात ठेवल्यास बाजूचा बराच भाग उघडा ठेवावा.

वॉर अँड पीस: दृष्टिभ्रम : अवघड मानसिक समस्या
शहरातच नव्हे; छोटय़ाछोटय़ा खेडय़ातही सर्वाच्या जीवनात पाश्चात्त्य, सुखासीन, चंगळवादी, भोगवादाचे नको तेवढे आक्रमण झाले आहे. एककाळ घरोघर मोठी माणसे काही नित्यपाठ म्हणायचे. ओव्या, देवदेवतास्तोत्र, अभंग, श्रीरामरक्षा, मारुतीस्तोत्र आपापल्यापरीने म्हणायचे. तुलनेने जीवनाकडे पापभीरू दृष्टीने व त्यामुळेच कळतनकळत सकारात्मक बघायचे.
फारफार पूर्वी करमणुकीचे साधन म्हणून घरोघर रेडिओ असायचा. शंभरात एखाद्याकडे ट्रान्झिस्टरसेट असायचा. या करमणुकीच्या माध्यमात आत्तासारखे बीभत्स, चंगीभंगी, चैनबाजी श्रीमंतीचे प्रदर्शन करणारे कार्यक्रम, कानावर अपवादानेच यायचे. वीसपंचवीस वर्षांपासून टेलिव्हिजन व अलीकडे मोबाइल फोनचे जबरदस्त आक्रमण झाले. पूर्वी एककाळ शहरामध्ये वाडासंस्कृती, चाळसंस्कृती होती. लोकांची दारे उघडी असत. शेजाऱ्यापाजाऱ्यांपाशी जाणेयेणे असे. साहजिकच बहुतेक समाज एकमेकांच्या दु:खात सहभागी व्हायचा. आत्ता ब्लॉकसंस्कृतीमुळे शेजाऱ्यांशी संपर्क तुटला; शेजारधर्म संपला. तुम्ही आम्ही ‘फक्त स्व, स्वत:चे कुटुंबापुरते पहायला लागलो.’ एक काळ समोर बोलणाऱ्या माणसाच्या शब्दावर चटकन विश्वास बसायचा. आता बहुसंख्य सुशिक्षित विशेषत: उच्चशिक्षित वर्गाची दृष्टी बदलली आहे. टीव्हीवरील भडक सीरियल; वर्तमानपत्रीय खोटय़ानाटय़ा बातम्या, सवंग जाहिराती यामुळे सुशिक्षित, अती सुशिक्षित जास्त संशयित बनत चालले आहेत. माझेकडे ‘चांगले ते वाईट, वाईट ते चांगले’ असा दृष्टिभ्रम झाल्याचे सांगणारी; नैराश्याने खचलेली मध्यमवयीन तरुणमंडळी अधुनमधून येतात. त्यांना सकारात्मक दृष्टी देण्याकरिता सकाळी सूर्यनमस्कार, प्राणायाम, दीर्घश्वसन, सायंकाळी लवकर सात्त्विक जेवण, भोजनोत्तर फिरणे याबरोबरच सकाळी अणूतेलाचे नस्य, लघुसूतशेखर, ब्राह्मीवटी, सारस्वतारिष्ट दोनवेळा, रात्रौ निद्राकरवटी. कानशिले, कपाळ, तळपायास रात्रौ शतधौतघृत जिरवणे असा सल्ला देतो. संशयात्म विनश्यति.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

pune leopard marathi news, shirur leopard marathi news
कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्याची मादी कैद
Height of Your Shadow Tells How Much Vitamin D Is Absorbed In Body
तुमच्या सावलीची उंची सांगते शरीराविषयी खूप महत्त्वाची ‘ही’ बाब; तज्ज्ञ सांगतात, उन्हाळ्यात कसा घ्यावा अंदाज?
Budh Rahu Yuti 2024
१८ वर्षांनी एप्रिलमध्ये २ ग्रहांची महायुती; ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी? कोणाला मिळणार भरपूर पैसा?
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती

आजचे महाराष्ट्रसारस्वत: ३१ ऑगस्ट
१८९३ >  नारायण धोंडो ताम्हणकर यांचा जन्म. १९३० ते ६० या तीन दशकांतील पुरोगामी व बुद्धिवादी मराठी समाज घडवण्यात ताम्हणकरांच्या साहित्याचे अप्रत्यक्ष, पण महत्त्वाचे योगदान आहे. ‘गोटय़ा’ , ‘चिंगी’  व ‘खडकावरला अंकुर’ ही त्यांची गाजलेली पुस्तके, तर ‘चकमकी’, ‘अनेक आशीर्वाद’ या पुस्तकांतून त्यांनी आजही कायम असणाऱ्या कौटुंबिक प्रश्नांची चर्चा केली. ‘ग्यानबा-तुकाराम’ हा पत्रसंग्रह, ‘मामा’, ‘गुजाताई’ या कादंबऱ्या तसेच काही नाटकेही त्यांनी लिहिली होती.
१९७३ > ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांचे निधन. ‘शिक्षणपत्रिका’ या नियतकालिकाचे संपादन त्यांनी केले, तसेच ‘बालकांचा हट्ट’,  ‘बालविकास व शिस्त’, ‘बिचारी बालके’ आदी पुस्तकांतून पालकांना मार्गदर्शन केले. ‘नदीची गोष्ट’, ‘सवाई विक्रम’ आदी अनेक पुस्तके त्यांनी मुलांसाठी लिहिली.
१९४० >  ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांचा जन्म. युगंधर, छावा या त्यांच्या गाजलेल्या अन्य कादंबऱ्या, तर ‘संघर्ष’ , ‘लढत’ या न गाजलेल्या. ‘मोरावळा’, ‘अशी मने असे नमुने’ हे व्यक्तिचित्रसंग्रह  तसेच शेलका साज, कांचनकण, कवडसे हे ललित लेखनही पुस्तकरूप झाले.
संजय वझरेकर

जे देखे रवी..      गटार गंगा
कोठल्याही सार्वजनिक रुग्णालयात जिथे आजारी माणसे असतात, तिथले वातावरण प्रसन्न असावे हे जरा भलतेच मोठे उद्दिष्ट झाले; परंतु निदान थोडेफार स्वच्छ असावे इतपत तरी बघायला हवे.
..  पण या दुय्यम उद्दिष्टांसाठी महानगरपालिका जो खर्च करते, तो एकंदर खर्चाच्या किती अंश असतो आणि या अंशातला किती भाग चुकार कामगारांवर खर्च होतो आणि त्यातून काय स्वच्छता निर्माण होते, याचे आकडे देऊन मी तुम्हाला धक्केदेत नाही; परंतु माझ्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत किती चुकार कामगार निलंबित झाले, असे विचाराल तर ४० वर्षांतला तो आकडा ४० च्यावर नसेल.
 याचा अर्थ असा की, सगळे अगदी नीट काम करीत होते, तरी अस्वच्छता वाढतच गेली. सात वाजता आपले कार्ड पंच करणारा कामगार तब्बल साडेआठपर्यंत काय करतो, मग अगदी हळुवारपणे जमिनीवर एखादा चित्रकार कसे कुंचले फिरवतो, तसा केर काढण्याचे कौशल्य कोठून मिळवितो, तो किती क्षेत्रफळ स्वच्छ करतो, हे करण्यास त्याला किती वेळ लागतो आणि हे मोजके काम संपल्यावर तीन वाजेपर्यंत तो कुठे गडप होतो, हे रहस्य त्या काळात मला कधीच उलगडले नाही.
 हा वर्षभरात किती रजा घेतो, जर अचानक रजा घेतली तर त्या बदलीचा हंगामी कामगार कुठून अवतरतो आणि तो किती वाजता कामावर चढतो (!) आणि अशा रजेचे आकडे किती आणि अशा रजा घेतल्यानंतर चौकशी होते का, जर झालीच तर ती चौकशी किती आठवडे, महिने किंवा वर्षे चालते, हे रहस्यही विश्वनिर्मितीच्या रहस्यापेक्षा जास्त गडद आहे.
चौकशी अधिकारी हे पद चौकशी करण्यासाठी असते की पद निर्माण करून पगार घेण्यासाठी असते, चौकशीनंतर झालेले आकलन मग पुढे कोण तपासतो आणि त्यातून निघालेली ऑर्डर टंकलिखित व्हायला किती दिवस जातात आणि त्यावर रुग्णालयाचा अधिष्ठाता अंमलबजावणी करतो की, युनियनला घाबरून फेरतपासणीचा आदेश देतो, याचाही तपास करणे मोठे उत्कंठावर्धक ठरेल.
समजा, कामगाराला दोन मुलगे आहेत. एकाला हक्काने महानगरपालिकेत नोकरी मिळावी, असा आग्रह आहे, तशी त्याला मिळाली. दुसऱ्या धाकटय़ाला एका खासगी पंचतारांकित रुग्णालयात मिळाली, तर मग हा धाकटा मोठय़ाच्या पगारापेक्षा कमी पगारात हाताचे चामडे फाटेपर्यंत संगमरवरी भिंती का घासतो आणि हा महानगरपालिकेतला मोठा मुलगा नोकरीच्या दुसऱ्या दिवशीपासून कसा उंडारतो, याचे रहस्य उत्क्रांतीवादाचा संशोधक डार्विनलाच विचारायला हवे.
रविन मायदेव थत्ते
rlthatte@gmail.com