अगदी लहान वासरा/रेडकापासून ते मोठय़ा गायी/म्हशींनी शरीराबाहेर टाकलेल्या विष्ठेचा (शेणाचा) रंग, वास, घनता, खरखरीतपणा यांच्या निरीक्षणावरून त्यांना झालेल्या आजाराचे स्वरूप ओळखता येते. तसेच त्यांनी घेतलेल्या आहाराचे स्वरूप, त्याचे प्रमाण आदीचेही विश्लेषण करता येते.
एक दिवस ते तीन महिने वयाच्या वासरा/ रेडकांमध्ये त्यांचे शेण पहिल्या पाच दिवसांपर्यंत चिकट, पिवळसर आणि गुळगुळीत असेल तर वासराचे आरोग्य व्यवस्थित असल्याचे समजावे. पण शेणात रक्त आढळले, शेण जोर करून टाकलेले, पांढरट, पाण्यासारखे पातळ व दरुगधीयुक्त असेल तर वासरा/रेडकाच्या शरीरात जंतूंनी प्रवेश केला आहे असे समजावे.
वेगवेगळ्या प्रकारचा चारा रवंथ करून पोटात गेल्यानंतर पडणाऱ्या शेणाचे निरीक्षण केल्यावर, ते घोडय़ाच्या लिदीसारखे घट्ट व फुटणारे असेल, तर त्या पशूंनी पाणी कमी प्यायले आहे, त्यांच्यात मिठाची व प्रथिनांची कमतरता आहे असे समजावे. शेणात अर्धा ते एक इंच लांबीचे तंतू आढळल्यास त्या पशूंनी तंतुमय चारा जास्त प्रमाणात खाल्ला आहे असे समजावे.
 शेण पातळ व जमिनीवर पडल्यावर सर्वत्र पसरणारे, गडद व गुळगुळीत असेल तर त्या पशूंच्या आहारामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त आहे, त्यांनी तंतुमय व कमी प्रतीचा चारा खाल्ला आहे असे समजावे.
शेण गुळगुळीत, बुडबुडे असलेले, हलक्या रंगाचे, मध्ये खड्डा असलेले व पेस्टसारखे असेल, तर त्या पशूला अपचनाचा त्रास झालेला आहे व त्याच्या पोटात फेसयुक्त वायू तयार झाला आहे असे समजावे.
शेण पाण्यासारखे पातळ व दरुगधी असलेले असेल तर पशूला जंतुजन्य आजार असून त्याच्या पोटात घाणेरडे पाणी गेले आहे, तसेच त्याला अपचन झाले आहे असा निष्कर्ष काढता येतो.
शेण चारवटासारखे व पाणीयुक्त असेल तर असे पशू पुरेसे रवंथ करत नाहीत किंवा त्यांच्या पोटाच्या कप्प्यात तार वा खिळा टोचत असल्याची शक्यता वर्तवता येते. शेणात मका, ज्वारी वा बाजरीचे दाणे दिसत असल्यास पशूला अपचन होत आहे व त्याचा खुराक चांगला दळला गेला नसल्याचे समजावे.

जे देखे रवी..      अज्ञान, विज्ञान आणि ज्ञान
ज्ञानेश्वरांकडून अनेक गोष्टी शिकलो. त्यातली एक म्हणजे सूर्याला अंधार माहीत नसतो किंबहुना अंधार या गोष्टीची त्याला कुणकुणही नसते. कारण अंधार ही कल्पना सूर्यापुढे टिकत नाही. आइन्स्टाईनने मला असेच काहीतरी सांगितले की, कोणालाही प्रकाशाचा वेग पार करता येत नाही. याचे कारण असे की वेग वाढतो तसे वजन वाढते आणि वजन वाढले तर वेग कमी होतो. जर वेग अजस्र प्रमाणात वाढणार असेल तर वजनही अजस्र प्रमाणात वाढते. समजा प्रकाशाचा वेग म्हणजे ससा, जो कधीच थांबणार नसेल, तर कासव जर समजा वेगाने पळू लागले तर त्याचा हत्ती होतो, पायही जाड होत असतील पण, ससा काही हत्तीला सापडत नाही. ज्ञानेश्वरांनी मला वाटते गीतेला धरून चंद्राबरोबर सूर्यालाही परप्रकाशित अशी उपलब्धी बहाल केली आहे. कारण सूर्याचे आईबाप ब्रह्म नावाची चीज असते. एकंदरच ही चढत्या भाजणीने चक्रावणारी गोष्ट आहे. या सगळ्याला विज्ञान म्हणतात. मग प्रश्न असा की ज्ञान कशाला म्हणायचे आणि त्याच्या मागे किंवा पुढे जाऊन अज्ञान म्हणजे काय? देवी, गोवर किंवा कांजिण्या झाल्या तर शरीरातली उष्णता काढण्यासाठी शीतलादेवीच्या पायाशी घालायचे हे अज्ञानच होते. प्रतिबंधक लशी टोचणे ही अज्ञानावरची मात विज्ञानाने शक्य केली. विज्ञान हे या विश्वाच्या ढोबळ आणि सूक्ष्म निरीक्षणापासून जसे निर्माण होते तसेच उत्स्फूर्तपणे निर्माण होऊ शकते. तापमान वाढल्यामुळे ब्रह्म पसरले आणि फुगा फुगावा तसे मग * हे विश्व हळूहळू अवतरले हे मुंडक उपनिषदातले विधान कोठल्या तरी अनामिक वैज्ञानिकाचे. आणि वस्तू चैतन्यातून प्रकटली असे म्हणून ते गणिताच्या सहय्याने सिद्ध करणारा आणि प्रयोगशाळेत कधीही पाऊल न टाकणारा आइन्स्टाईन  आधुनिक उपनिषदकार. परंतु अचंब्याची गोष्ट अशी की विज्ञान मार्गे जाताना हे विश्वातले वैविध्य एकाच कोठल्या तरी गोष्टीतून आले असे म्हणणे हल्ली मान्यता प्राप्त असले, तरी त्या एकल तत्त्वात माणूस एकजीव होऊ शकतो का, हा प्रश्न ज्ञानाच्या प्रांतात येतो आणि त्याचे उत्तर ‘एकजीव होऊ शकत नाही’ असे आहे. जोवर मी असतो तोवर एकजीवता होत नाही. आणि एकजीवता झाली तर मी उरत नाही. मग एकजीवता झाली असे म्हणणार कोण? एकजीवता झाल्यावर ते आणि मी दोन्ही ढासळते या पाश्र्वभूमीवर ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान हे माणसाने निर्माण केलेले खेळ आहेत असे जे तत्त्वज्ञान आहे ते ज्ञानेश्वरांच्या नावावर आहे आणि ते त्यांनी ज्ञानेश्वरीनंतर अनुभवामृत किंवा अमृतानुभव या आपल्या तत्त्वकाव्यात मांडले आहे. विश्वास ठेवा अगर न ठेवा त्यात क्रिकेटचा (!) उल्लेख आहे.
(* फुग्याचे उदाहरण उपनिषदातले नाही. ते अधुनिक विज्ञानातले आहे.)
रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…

वॉर अँड पीस    क्षय : भाग ५
अनुभविक उपचार – १६) स्त्रियांना धुपणी, अंगावर पांढरे जाणे, पाणी जाणे, पांडुता – या तक्रारी असताना चंद्रप्रभा, कामदुधा, प्रवाळ प्रत्येकी तीन गोळ्या दोन वेळा बारीक करून रिकाम्या पोटी घ्याव्यात, शतावरीकल्प तीन चमचे एक कप दुधात मिसळून घ्यावा किंवा शतावरीघृत २ चमचे २ वेळा घ्यावे. जेवणानंतर जीरकाद्यारिष्ट ३ चमचे समभाग पाण्याबरोबर घ्यावे. सकाळी व सायंकाळी अर्धा चमचा जिरे घ्यावे. १७) गंडमाळा  हे प्रमुख लक्षण असल्यास, आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, त्रिफळागुग्गुळ, गोक्षुरादि, लाक्षादिगुग्गुळ, कांचनार प्र. ३ गोळ्या २ वेळा बारीक करून घ्याव्यात. सुधाजल ४ चमचे २ वेळा. अमरकंदाचे चूर्ण सकाळी १ चमचा घ्यावे. १८) मधुमेह, थकवा, खर जाणे अशा तक्रारीत चंद्रप्रभा, आरोग्यवर्धिनी, मधुमेहवटी प्र. ३ गोळ्या २ वेळा घेणे. सकाळी रसायन चूर्ण व रात्री आस्कंदपूर्ण १ चमचा घेणे. १९) बालकांच्या मुडदुस, हातापायाच्या काडय़ा, पोटाचा नगरा या तक्रारीत अस्थिक्षय असतो. त्यात ज्वरांकुश सकाळ सायं. ३ गोळ्या, जेवणानंतर आरोग्य काढा ३ चमचे समभाग पाण्याबरोबर घ्यावा.
रुग्णालयीन उपचार – १) अरुचि, अन्नद्वेष अशी लक्षणे असताना प्रथम साधा निरुहबस्ति एनिमा घ्यावा. त्यानंतर साळीच्या लाह्य़ांच्या उकळलेल्या पाण्याचा बृंहणबस्ति एनिमा कॅथेटरच्या साहाय्याने थेंब थेंब सलाइनसारखा घ्यावा.  २) आतडय़ात व्रण असल्यास याच पद्धतीने दुधाचा थेंबाथेंबाने एनिमा घ्यावा. ३) रुग्णालयात रुग्ण इतरांपासून वेगळेच ठेवून उपचार करावेत. ४) रुग्णाला मानसिक स्वास्थ्य, आराम, ताजे रुचकर अन्न, चांगले वातावरण या गोष्टी कटाक्षाने मिळावयास हव्यात. ५) अंगात कडकी खूप असल्यास चंदनबलालाक्षादि तेल, शतावरीसिद्ध तेल मसाजकरिता वापरावे.
उपचारांची दिशा – तोंडाला चव येणे, भूक, वजन वाढणे, ताप घटणे, उत्साह वाटणे यावर लक्ष असावे. अग्निदीपक, बल्य पण कफनाशक उपचार हवे. अग्निवर्धक उपचारांनी हातापायांची जळजळ वाढू नये, सर्दी, कफ, ताप येऊ नये अशी योजना हवी.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत        २२ जुलै
१९०८ > इंग्रजी वाङ्मयातील आधुनिकतेच्या परंपरेचा वेध घेणारे अनुवादक आणि लेखक भालचंद्र महेश्वर गोरे यांचा जन्म. ‘लघुतमकथा’ हा प्रकार अधिक रुजवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ‘आधुनिक आंग्लवाङ्मय’ हे पुस्तक त्यांनी लिहिले, अ‍ॅम्ब्रोज बिअर्सच्या लघुकथांचा अनुवाद केला. थॉमस हार्डीच्या कादंबरीचा ‘गर्दीपासून दूर, मनोऱ्यावर’ हा अनुवाद, तसेच होमरचे ‘इलियड’ व शेक्सपिअरच्या नाटकांचा परिचय करून देणारी पुस्तकेही त्यांनी लिहिली. याखेरीज अनेक स्वतंत्र लघुकथा, लघुतमकथा व बालवाङ्मयही त्यांनी लिहिले होते.
१९२८ > लेखक, पत्रकार, संपादक गोविंद श्रीपाद तळवलकर यांचा जन्म. ‘नौरोजी ते नेहरू’, ‘सत्तांतर (दोन खंड)’, ‘बाळ गंगाधर टिळक’ आणि ‘विराट ज्ञानी (न्या. म. गो. रानडे)’, ‘सोव्हिएत साम्राज्याचा उदय आणि अस्त (तीन खंड)’ आदी पुस्तके त्यांनी लिहिली, तसेच त्यांच्या सडेतोड, विश्लेषक अग्रलेखांचे ‘अग्रलेख’ हे संकलन आणि ‘वाचस्पती’ या टोपणनावाने त्यांनी केलेल्या ग्रंथविषयक लिखाणाचे ‘वाचता वाचता’ प्रसिद्ध आहे. तळवलकर- लिखित मृत्युलेखांचेही ‘पुष्पांजली’ हे पुस्तक झाले आहे.
संजय वझरेकर