महानगरामधील प्रमुख बाजारपेठांच्या भागात विजेची मागणी मोठय़ा प्रमाणात असून दिवसेंदिवस वाढत जाणारी आहे. या मागणीची पूर्तता करण्यासाठी विद्युत कंपन्यांना ‘विद्युत उपकेंद्र’ उभारावे लागते. त्यासाठी लागणारी जागा अशा भागात मिळणे कठीण  व खर्चीक असते. अशा ठिकाणी गॅस इन्सुलेटेड सब-स्टेशन (GIS) उभारून सल्फर हेक्झाफ्लोराइड (SF6)वायूच्या वापरामुळे नेहमीच्या उपकेंद्रापेक्षा २५% जागेत पूर्तता करता येते.
का बरं या उपकरणात सल्फर हेक्झाफ्लोराइड वापरत असावेत?
सल्फर हेक्झाफ्लोराइड या वायूचे संयुगसन १९०० मध्ये मौसन व प्लीबी या शास्त्रज्ञांनी पॅरिसमध्ये केले. या वायूचे विद्युतरोधक गुणधर्म १९३७ मध्ये जनरल इलेक्ट्रिकमधील संशोधकाच्या     लक्षात आले. १९४७ मध्ये या वायूचा वापर विद्युत ट्रान्सफॉर्मरमध्ये तेलाच्या ऐवजी केला गेला. पुढे १९६४ मध्ये पॅरिसमध्ये प्रथमत: हा वायू वापरून जीआयएस उभारण्यात आले. आज जगभरातील महानगरांमध्ये, डोंगर-दऱ्यात जेथे विद्युत उपकेंद्रासाठी पुरेशी, योग्य जागा मिळणे खर्चीक होते, अशा ठिकाणी जीआयएस पद्धतीचे उपकेंद्र वापरले जाते. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, भांडुप, कोयना टप्पा-४ येथे अशा प्रकाराची उपकेंद्रे आहेत.
सल्फर हेक्झाफ्लोराइड हा वायू हवेपेक्षा वजनाने सुमारे सहापट जड आहे. हा वायू रंगहीन, चवहीन असून बिनविषारी, अज्वालाग्राही आहे. अतिप्रखर उष्णतेमध्ये सल्फर हेक्झाफ्लोराइडचे सल्फर टेट्राफ्लोराइड (SF4) व सल्फर डायफ्लोराइड (SF2)मध्ये विघटन होते. हेही वायू विद्युतरोधक आहेत. तपमान कमी झाल्यावर त्यांचे पुन्हा संयोजन होऊन सल्फर हेक्झाफ्लोराइड बनतो.  ५०० अंश सेल्सियस तपमानापर्यंत या वायूचे विघटन होत नाही. हायड्रोजन, क्लोरिन, प्राणवायू व आम्ले यांचा सल्फर हेक्झाफ्लोराइडवर परिणाम होत नाही. रासायनिकदृष्टय़ा हा वायू जवळजवळ निष्क्रिय आहे. या वायूवरील दाब वाढविला असता त्याचे विद्युतरोधक गुणधर्म वाढतात. त्यामुळे जीआयएसमधील उपकरणात सामान्य वातावरणीय दाबाच्या सहा ते सातपट दाब राखला जातो. त्यामुळे दोन विद्युतभारित तारांमधील अंतर अतिशय कमी ठेवून सुरक्षा राखता येते. उच्च दाबाच्या स्विचेसमध्ये जेव्हा विद्युतप्रवाह बंद होतो, तेव्हा मोठय़ा प्रमाणात विजेच्या ठिणग्या निर्माण होतात. त्याचे त्वरित खंडन करण्यासाठी अशा स्विचेसमध्ये अधिकतम दाबाचा सल्फर हेक्झाफ्लोराइड वायू वापरला जातो.

प्रबोधन पर्व: भेदभावना हे समाजाचे नैतिक दौर्बल्य
‘‘मराठा समाज व तत्सम इतर जाती यांतील भेद तोडावे लागतीलच, पण मराठा समाजाच्या आजवरच्या संग्राहक वृत्तीकडे लक्ष देता हे भेद तोडणे विशेष कठीण होऊ नये. पुढील खरा महत्त्वाचा प्रश्न मराठे-महार संबंधाचा. आज ब्राह्मणेतरांची ब्राह्मणांबाबतची जी परिस्थिती तत्सदृशच महारांची मराठय़ांबाबतची. शिवाय महार समाज आज सर्वत्र विखुरलेला असल्यामुळे या परिस्थितीचे निराकरण विशेषच कठीण होणार. अंती जातिभेद नष्ट होऊन ब्राह्मण, महार व इतर सर्वच मराठे बनावे; पण हे क्रमाने होणार. या परिवर्तनाची पहिली पायरी म्हणजे ब्राह्मणांनी वर दर्शविल्याप्रमाणे आपणच जबाबदारी पत्करणे ही होय. मराठे व तत्सम, मराठे व महार हे भेद आहेत तोवर आम्हांवरही काही जबाबदारी नाही, सगळे प्रश्न एकदमच सुटले पाहिजेत, अशी भाषा साम्राज्यशाहीवाल्यांच्या कांगाव्यासारखी आहे. आपल्यावरील जबाबदारी पार पाडण्यास लागले, म्हणजे त्यानेच इतर प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. काही झाले तरी ब्राह्मण-ब्राह्मणेतर हा प्रश्न अत्यंत निकडीचा आहे; त्याबाबत दिरंगाई करून चालण्यासारखे नाही; हे समजण्यात व त्यावर विचार करून उपाययोजना त्वरित करण्यातच शहाणपणा आहे.’’ ध. रा. गाडगीळ १९४८ साली लिहिलेल्या लेखात महाराष्ट्रीय समाजाविषयी लिहितात – ‘‘आपल्या समाजाची प्रगती शांततामय लोकशाहीच्या मार्गाने होताना दिसत नाही. प्रत्येक राजकीय पक्ष विरोधी पक्षांचा मोड हरतऱ्हेने व हरयुक्तीने करावा याच विचाराचा दिसतो; आणि पक्षभेदभावना इतकी तीव्र झाली आहे की, विरोधी पक्षाच्या व्यक्तींची कोणत्याही तऱ्हेने हानी झाली असता त्यात आनंद मानणारे लोक सर्व पक्षांच्या प्रतिष्ठितांत आढळतात. तसेच गुंडांचा व्यक्तिश: किंवा संघटित रीत्या प्रतिकार करण्याची असमर्थता, व स्वत:च्या आणि स्वपक्षाच्या तात्कालिक फायद्यासाठी गुंडगिरीस उत्तेजन देण्याची अगर तिजबद्दल तटस्थता स्वीकारण्याची वृत्ती, ह्य़ा गोष्टी आपल्या समाजाचे नैतिक दौर्बल्य व अदूरदर्शित्व प्रकट करतात. हे सर्व प्रश्न राजकारणाशी निगडित असल्याने त्यांचा विचार इतक्यात शांतपणे होऊ शकेल, असे दिसत नाही.’’

Tata Punch Car sale
टाटाच्या ‘या’ सर्वात स्वस्त SUV नं Wagon R, Dzire चं वर्चस्व संपवलं? झाली दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी
Toronto airport cargo facility Heist
कॅनडामध्ये ‘मनी हाइस्ट’ प्रमाणे सर्वात मोठी चोरी; भारतीय वंशाच्या आरोपींनी ४०० किलो सोने पळविले
Among the vehicles inspected by the RTO 14 percent of the vehicles are polluting
मुंबई : आरटीओने तपासलेल्या वाहनांमध्ये १४ टक्के वाहने प्रदूषणकारी
Anant Goenka and Minister Piyush Goyal
‘तेजांकित’ तरुणच देशाचे भविष्य, केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांचे प्रतिपादन; ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ विजेत्यांचे विशेष कौतुक

मनमोराचा पिसारा: जीना शॉपिंग मरना शॉपिंग
‘मानस, ए मानस, प्लीज कोणाला सांगू नकोस, मला एक सिक्रेट सांगायचंय. प्लीज मस्करी न करता ऐक.’
मानसी काकुळतीला येऊन म्हणाली. ‘सांग ना, मला नाही तर कुणाला सांगणार?’ असे भाव मानसच्या चेहऱ्यावर होते. मानसीने पुन्हा ‘प्लीज’ म्हटलं. ‘ओके, जस्ट तुझ्यामाझ्यात!’ मानस म्हणाला.
‘मानस, मला ना, शॉपिंगचं व्यसन लागलंय. मी शॉपॉहॉलिक (अल्कॉहॉलिक: मद्यपीसारखी) होत चालले आहे..  मी खूप खर्च करते असं नाही, पण दुकानांत, मॉलमध्ये मी जाऊन भटकते. मला दुकानं तिथला उजेड, चटपटीत दिसणारे विक्रेते, चकचकीत वेष्टनातल्या गोष्टी पाहाव्याशा वाटतात. माझं मन तिथे खूप एक्साईट होतं. अजून मी वेडय़ासारखं काही तरी नको त्या गोष्टी नाही विकत घेत, तेवढा निग्रह माझ्यात शिल्लक आहे आणि मी मनावर तितपत कंट्रोल ठेवते. बट् यू नो, मला तिथे दुकानात जावंसं वाटतं!  कस्टमर म्हणून पाहणी करावीशी वाटते..
‘हंऽऽ’ म्हणून मानसनं निश्वास सोडला. ‘केस नाही हाताबाहेर गेलीय’, असं म्हणून मानसीच्या दंडावर मानसनं चापटी मारली. ‘बरं मला सांग, शॉपिंगला गेल्यावर तुला एक्सायटेड वाटतं हे कळलं, पण तिथे जाण्यापूर्वी तुझी मन:स्थिती कशी असते?’ मानसी विचारात पडली. ‘असा नव्हता विचार केला कधी. वेल. खरं सांगू.. मला खूप रिकामं, ‘एम्प्टी’ वाटतं.. कंटाळा नाही, नुस्तं रिकामं! आपण काय करावं? या वेळाचं काय करावं? हे कळत नाही! अ‍ॅज इफ मला काही पर्पज नाही, असं वाटतं!’
‘मोठ्ठा शब्द सांगतोय’ मानस डोळे मिचकावत म्हणाला. ‘याला अस्तित्ववादी पोकळी एक्झिस्टेंशिअल व्हॅक्यूम’ म्हणतात. मानसीचे डोळे पाणावलेले पाहून मानस म्हणाला, ‘याचा सोपा अर्थ असाय की आपल्याला आलेलं निर्थक रिकामपण.’ आपलं आयुष्य म्हणजे आपण ठरवलेल्या उद्दिष्टाचा शोध असतो. त्यात आपण वेगवेगळे प्रयोग करतो. म्हणजे कोणाला वाटतं, प्रेम करावं, द्यावं नि घ्यावं, कोणी म्हणतं पैसा कमवावा, साठवावा किंवा उडवावा, तर कोणाला आणखी काही. बऱ्याच जणांचं अर्धवय आयुष्याचं उद्दिष्ट काय हे शोधण्यात जातं. तर काही आपल्यासारखे कोणीतरी दिलेल्या (पालक, समाज) उद्दिष्टांच्या मागे पळण्यात संपूर्ण आयुष्य घालवतात.
आपण जगतो कशासाठी? हा माणसाला पिढय़ान्पिढय़ा पडलेला प्रश्न आहे! मानसी, आपल्यासारख्या सामान्य मध्यमवर्गीयांच्या अशा संभ्रमित अवस्थेची ही कथा आहे. सामान्यत: ठरावीक (घर, गाडी, मुलांची शिक्षणं इ.) उद्दिष्टे संपली की बहुतेक मध्यमवयीन आणि प्रौढ लोकांना अशी पोकळी जाणवते. मानस म्हणाला, ‘सॉलिड हाय फंडा आहे रे!’ मानसी म्हणाली, पण याचा शॉपिंगशी काय संबंध?
हीच खरी मार्केट इकॉनॉमीची मेख आहे. आपल्या या रिकामपणाला गुंगवणारी, भूल पाडणारी व्यूहरचना हे मार्केटिंगवाले लोक करतात आणि आपल्या मनात ‘वस्तूंविषयी आसक्ती निर्माण करतात.’ आसक्ती वाटली की आपण निघालो शॉपिंगला. मग शॉपिंगला हा विरंगुळा. शॉपिंग ही मजा, शॉपिंग ही सहल असं म्हणता म्हणता शॉपिंग हेच जगण्याचं उद्दिष्ट होतं. आपल्या स्वतंत्र अस्तित्वाला अर्थ राहत नाही. आपण मार्केटच्या लेखी एकमेव अस्तित्व.. आपण फक्त ग्राहक नि ते विक्रेते.
मेरा जीना शॉपिंग, मरना शॉपिंग असं म्हणता म्हणता, ‘आय बाय, देअरफर आयअ‍ॅम’ असं म्हणू लागतो.
 ‘मग मी काय करू?’ मानसी म्हणाली. ‘जीवनाचा नुस्ता आनंद घे, निरुद्देश भटक. संगीत, वाचन क्रीडा, व्यासंग..खूप काही..’
डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com