सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com

‘अभिषिक्तानंद’ या नावानेच अधिक ओळखले जाणारे आंरी (हेन्री) ल सॉ – ऌील्ल१्र छी रं४७ हे  मूळचे एक फ्रेंच नागरिक. पुढे ते आध्यात्मिक साधनेसाठी भारतात आले. भारतातील आपल्या २५ वर्षांच्या वास्तव्यात िहदू आणि ख्रिश्चन या धर्मामध्ये त्यांनी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. या दोन धर्मामधील त्यांची समन्वयाची भूमिका फार महत्त्वाची समजली जाते.

हेन्री यांचे पाळण्यातले नाव आंरी ब्रिऑक मेरी, जन्म १९१० सालचा, फ्रान्समधील ब्रिटनी परगण्यातल्या सेंट ब्रिऑक येथील. आल्फ्रेड ल सॉ यांच्या या द्वितीय पुत्राला बालपणापासूनच वैराग्याचे मोठे आकर्षण. त्यामुळे हेन्रीचे प्राथमिक शिक्षण कॅथलिक मठातच झाले. पुढे त्यांचा कल पाहून वडिलांनी त्यांना मठातच राहावयास परवानगी दिल्यावर वयाच्या एकोणिसाव्या वर्षी हेन्री बेनेडिक्टीन पंथाच्या मोनोस्टेरीत राहावयास लागले. या मठात त्यांनी निस्संग, तपस्वी वृत्तीच्या जीवनशैलीत एकोणीस वर्षे व्यतीत केली. या काळात भारतीय अध्यात्मवादाबद्दल बरीच माहिती त्यांना कळली आणि भारताबद्दलचे त्यांचे मूळचे आकर्षण अधिकच वाढत गेले. परंतु याच काळात दुसरे महायुद्ध अधिकच पेटले आणि हेन्रींना सक्तीने फ्रेंच लष्करात सरजट म्हणून भरती व्हावे लागले.

दुसऱ्या महायुद्धाची धामधूम संपली आणि हेन्री परत आपल्या बेनेडिक्टीन मठात पूर्ववत राहू लागले. भारतीय अध्यात्मवाद आणि तत्त्वज्ञानाची ओढ होतीच. त्या काळात हेन्रींच्या परिचयाचे, बेनेडिक्टीन ख्रिस्ती पंथाचे धर्मप्रचारक फादर ज्यूल्स मोन्शावीन गेली पाचसात वर्षे दक्षिण भारतात त्रिचनापल्ली येथे चर्चचे धर्मप्रसारक म्हणून काम करीत होते. हेन्रींनी त्यांच्याशी संपर्क साधून आपल्याला भारतात राहून कार्य करण्याची इच्छा आहे तरी कोणत्याही चर्चच्या संघटनेत भारतात आपल्याला प्रवेश मिळेल काय अशी विचारणा केली. फादर ज्यूल्सनी या गोष्टीसाठी तयार होऊन तामिळनाडूतील एका चर्च संघटनेची हेन्रींसाठी प्रवेशाची अनुमती मिळवली. फादर ज्यूल्सनी ही गोष्ट हेन्रींना कळवली; पण पुढचे दोन-तीन महिने फ्रान्समध्येच राहून काही गोष्टींची तयारी करण्यास सांगितले.