अद्वितीय काव्यप्रतिभा आणि संवेदनशील मन ही ईश्वरी देणगी लाभलेल्या मिर्झा गाम्लिबच्या रूपाने एक महान गजलकार भारताला लाभला. गजल ही उर्दू काव्याची सम्राज्ञी मानली जाते आणि मिर्जा गाम्लिबच्या कल्पनाविलासामुळे उर्दू शायरीला एक उंची प्राप्त झाली आहे. गाम्लिब हा श्रेष्ठ उर्दू कवी मानला जात असला तरी त्याचं बरंचसं काव्य फारसी भाषेत आहे. मिर्झा गाम्लिबचा जन्म आग्य्रात १७९७ साली झाला. त्याचे पूर्वज तुर्की आणि समरकंद येथून स्थलांतरित झालेले. गाम्लिबचे मूळ नाव मिर्झा असदुल्लाह बेग. त्याने पुढे गाम्लिब हे टोपणनाव घेतले. गाम्लिब म्हणजे सर्वोत्तम. मिर्झा अब्दुल्ला बेग हे त्याचे वडील आणि इज्जत-उत-निसा बेगम ही त्याची आई. गाम्लिबचे आजोबा एक सनिक म्हणून भारतात आले आणि प्रथम मोगलांकडे आणि नंतर जयपूर संस्थानात नोकरीस राहिले. गाम्लिबचे वडील अब्दुल्ला बेग अलवार संस्थानात नोकरीत असताना एका लढाईत मारले गेले.

गाम्लिब पाच वर्षांचा असताना वडिलांचा मृत्यू झाल्यावर काका नसरुल्ला बेगने त्याचा सांभाळ केला. आग्रा येथील मौलाना शेख मुअज्जमकडे गाम्लिबचे शिक्षण झाले. किशोरवयात येईपर्यंत फारसी भाषा, इस्लामपूर्व संस्कृती, इस्लाम, सूफी मत, ज्योतिष या विषयांमध्ये गाम्लिबने चांगली प्रगती केली. पण त्याला उपजत गती होती भाषा आणि साहित्य या विषयात. बालवयातच फारसी भाषेच्या प्रेमात पडलेल्या असदुल्लाह ऊर्फ गाम्लिबनं नऊ वर्षांचा असतानाच फारसी आणि उर्दूमध्ये शायरी करणं सुरू केलं.

Senior police inspector Daya Nayak and Salman Khan
सलमान खानच्या घराजवळ गोळीबाराचं प्रकरण, एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक करणार तपास
harsul jail police murder marathi news
छत्रपती संभाजीनगर: हर्सूल कारागृह आवारात पोलिसाचा खून; एक गंभीर
engineer man killed his father in chhatrapati sambhajinagar
छत्रपती संभाजीनगर : अभियंता मुलाकडून वडिलांचा निर्घृण खून
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: सामना चालू असतानाच चाहता मैदानात आला आणि रोहित शर्मा घाबरला; घटनेचा Video सोशल मीडियावर व्हायरल!

गाम्लिब जरी सुन्नी होता तरी शिया पंथाचे संस्थापक हजरत अली यांचा मोठा आदर करीत असे, कारण अली एक श्रेष्ठ शायरही होते. अलीसाहेबांना ‘असदुल्लाह हिल गाम्लिब’ अशी पदवी होती. गाम्लिबचे मूळ नाव असदुल्लाह म्हणजे अल्लाचा सर्वोत्तम सिंह असेच होते. असद नावाचा आणखी एक शायर असल्यामुळे त्याने अलीच्या नावातला ‘गाम्लिब’ घेऊन आपले नाव मिर्झा गाम्लिब केले.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com